IPL 2024, MI vs RR : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात या खेळाडूंवर असेल नजर, कोण आहेत ते जाणून घ्या

आयपीएल 2024 स्पर्धेतील 38वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. स्पर्धेत दुसऱ्यांदा हे दोन संघ भिडणार आहे. पहिल्या सामन्यात राजस्थानने मुंबईचा धुव्वा उडवला होता. आता मुंबईकडे स्पर्धेतील वचपा काढण्याची संधी आहे. चला जाणून घेऊयात या सामन्यात कोणते खेळाडू सक्षम ठरतील ते..

IPL 2024, MI vs RR : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात या खेळाडूंवर असेल नजर, कोण आहेत ते जाणून घ्या
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 4:06 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये दोन्ही संघ भिडणार आहेत. राजस्थान रॉयल्सची बाजू या स्पर्धेत भक्कम आहे. आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्सने 7 पैकी फक्त 3 सामन्यात विजय मिळवला असून गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स आतकापर्यंत 29 वेळा आमनेसामने आले आहेत. मुंबई इंडियन्सने 15, तर राजस्थान रॉयल्सने 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना निकालाविना सुटला आहे. 1 एप्रिल रोजी वानखेडे मैदानावर हे दोन संघ भिडले होते. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 9 गडी गमवून 125 धावा केल्या होत्या. राजस्थानने हे आव्हान 15.3 षटकात पूर्ण केलं. आतापर्यंत दोन्ही संघांची कामगिरी पाहता काही खेळाडू सामना फिरवू शकतात. चला जाणून घेऊयात या खेळाडूंबाबत

मुंबई इंडियन्सचे सहा, तर राजस्थान रॉयल्सच्या पाच खेळाडूंचा यात समावेश आहे. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रोमारियो शेफर्ड, इशान किशन यांचा समावेश आहे. तर राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलर, संजू सॅमसन, शिम्रॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल हे खेळाडू चमकदार कामगिरी करू शकतात.

जयपूरची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज या दोघांना मदत करणारी आहे. मागच्या चार सामन्यात या मैदानावर 180 पर्यंत स्कोअर झाला आहे. राजस्थान रॉयल्सने या मैदानात 185 आणि 193 धावा विजयाला दिल्या होत्या. या धावा राजस्थानच्या गोलंदाजांनी डिफेंड केल्या आहेत. पण गुजरात विरुद्ध केलेल्या 196 धावा रोखण्यात अपयश आलं होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 183 धावा विजयासाठी दिल्या होत्या. या धावांचा पाठला राजस्थानने यशस्वीरित्या केला.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह. इम्पॅक्ट प्लेयर – आकाश मढवाल.

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, आवेश खान, संदीप शर्मा. इम्पॅक्ट प्लेयर- नांद्रे बर्गर.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.