AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : ग्लेन मॅक्सवेलला प्रत्येक रन्ससाठी मिळाले इतके लाख, चाहत्यांनी मांडलं गणित

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रवास एलिमिनेटर सामन्यानंतर थांबला आहे. या सामन्यातील पराभवानंतर चाहते पुन्हा एकदा नाराज झाले आहेत. कारण आणखी एका पर्वाची जेतेपदासाठी वाट पाहावी लागणार आहे. सलग 17 वर्षे आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. दरम्यान या स्पर्धेत ग्लेन मॅक्सवेलची चर्चा रंगली आहे.

IPL 2024 : ग्लेन मॅक्सवेलला प्रत्येक रन्ससाठी मिळाले इतके लाख, चाहत्यांनी मांडलं गणित
| Updated on: May 23, 2024 | 4:37 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेच्या सुरुवातीला आरसीबीला जेतेपदासाठी दावेदार मानलं जात होतं. मात्र स्पर्धेतील सुरुवात पाहून प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आरसीबीने जोरदार कमबॅक केलं. सलग सहा सामन्यात करो या मरोची लढाई पार करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. पण एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यात आरसीबीची फलंदाजी हवी तशी झाली नाही. आरसीबीचं रन गाडं 172 धावांवर आडलं आणि विजयासाठी फक्त 173 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान आरसीबीने 19व्या षटकात पूर्ण केलं. मात्र या सामन्यानंतर ग्लेन मॅक्सवेलच्या कामगिरीचं ऑडिट होत आहे. निराश झालेल्या चाहत्यांनी ग्लेन मॅक्सवेलला धारेवर धरलं आहे. महत्त्वाच्या सामन्यात केलेली चूक आरसीबीला किती महागात पडली याचा लेखाजोखा मांडला आहे. आयपीएल स्पर्धेत आरसीबीकडून सर्वात सुमार कामगिरी करणारा फलंदाज म्हणून ग्लेन मॅक्सवेलचं नाव पुढे आलं आहे. सामन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा हा फॉर्म कायम राहिला.

मोठी धावसंख्या उभारण्याची गरज असताना पहिल्याच चेंडूवर बाद होत तंबूत परतला. इतकंच काय तर राजस्थानवर दबाव टाकण्यासाठी विकेट महत्त्वाच्या असताना प्लेऑफच्या पाचव्या षटकात एक सोप झेल सोडला. टॉम कोहलरचा झेल पकडला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. राजस्थानवर दडपण आणण्यास मदत झाली असती. त्यामुळे मॅक्सवेल फलंदाजीसोबत क्षेत्ररक्षणातही अपयशी ठरला. एकूण आयपीएलचा विचार करता मॅक्सवेलचं योगदान फक्त 52 धावांचं होतं. म्हणजेच 10 सामन्यात फलंदाजी करणाऱ्या मॅक्सवेलने 5.78 च्या सरासरीने 52 धावा केल्या. या पर्वात तो पाचवेळा शून्यावर बाद झाला.

आरसीबी फ्रेंचायसी मॅक्सवेलसाठी एका पर्वात 11 कोटी रुपये मोजते. म्हणजेच 52 धावा करणाऱ्या मॅक्सवेलला प्रति रन्स 21 लाख रुपये मिळाले. ग्लेन मॅक्सवेळ 10 सामन्यात एकूण 6 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला. म्हणजेच ग्लेन मॅक्सवेलचा आरसीबीला काहीच उपयोग झाला नाही. उलट मॅक्सवेलच्या कामगिरीमुळे आरसीबीवर मोक्याच्या क्षणी दडपण वाढलं. त्यामुळे पुढच्या मेगा लिलावात मॅक्सवेलला रिलीज करण्याची चर्चा रंगली आहे. आता फ्रेंचायसी काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.