AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, RR vs KKR : नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने, संजू सॅमसन गोलंदाजी घेत म्हणाला..

आयपीएल 2024 स्पर्धेतील 31वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघांची या स्पर्धेतील कामगिरी चांगली राहिली आहे. राजस्थानचा संघ 10 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर कोलकात्याचा संघ 8 गुणांसह त्या खालोखाल आहे.

IPL 2024, RR vs KKR : नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने, संजू सॅमसन गोलंदाजी घेत म्हणाला..
| Updated on: Apr 16, 2024 | 7:08 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेतील फॉर्मात असलेल्या दोन संघात आज लढत होत आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना होत आहे. राजस्थान आणि कोलकात्याने या स्पर्धेत फक्त एक सामना गमावला आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ अव्वस स्थानी राहण्याचा प्रयत्न करतील. राजस्थान रॉयल्सने 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला असून +0.767 नेटरेट आणि 10 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर कोलकात्याने 5 पैकी 4 सामने जिंकत 8 गुण आणि +1.688 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो संघ पहिल्या स्थानावर येणार आहे. नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. नाणेफेक करताना नाणं कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या हाती सोपवलं. त्याने त्यावेळी नाण्याला किस करत हवेत उडवला. मात्र हा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि संजू सॅमननने गोलंदाजी स्वीकारली.  हा धागा पकडत संजय मांजरेकरने संजू सॅमसनला प्रश्न विचारला, “आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. यावर पाठलाग करणे चांगले असू शकते. ईडन गार्डन्समध्ये परत येण्यासाठी खूप उत्साही आहोत. स्टेडियममध्ये एक छान वातावरण आहे. जोस आणि अश्विन या गेमसाठी उपलब्ध आहेत. ते परत येत आहेत.”

कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, “सामना कसा फिरला याच्या आधारे शेवटच्या खेळावर आधारित गोलंदाजी करायलाही आवडले असते. जेव्हा जेव्हा नरीन आत येतो तेव्हा त्याला वाचणे कठीण असते आणि त्याच्या निर्विकार चेहरा असतो. त्याच्याकडे जशी कामगिरी आहे आहे तशीच करावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही मागचा संघच घेऊन खेळत आहोत.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरीन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.