IPL 2024 | आयपीएल सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?
IPL 2024 Matches Live Streaming And Broadcast | आयपीएलच्या 17 व्या मोसमाचा नारळ 22 मार्चपासून फुटणार आहे. सर्व सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?

मुंबई | आयपीएल 2024 च्या पहिल्या टप्प्याची सुरुवात शुक्रवारी 22 मार्चपासन होतेय. लोकसभा निवडणुकांमुळे 17 व्या मोसमातील पहिल्या 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार या पहिल्या टप्प्यात 2 डबल हेडरसह एकूण 21 सामने पार पडणार आहेत. आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी सर्व तयारी झाली आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये या 17 हंगामासाठी उत्साहाचं वातावरण आहे. या मोसमातील पहिला सामना हा गतविजेता संघ चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. या सामन्यानिमित्ताने क्रिकेट चाहत्यांना या हंगामातील संपूर्ण सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येतील? हे जाणून घेणार आहोत.
आयपीएलमधील संपूर्ण सामने हे मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येतील. यासाठी एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही. मराठी, हिंदी, इंग्रजीसह अन्य स्थानिक भाषांमध्ये क्रिकेट चाहत्यांना सामन्यासह आपल्या भाषेत कॉमेंट्रीची मजा घेता येणार आहे. तसेच सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. आयपीएलमधील दुपारचे सामने 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील. तर संध्याकाळचे सामने 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील. तसेच सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवरुन जाणून घेता येतील.
धोनी-विराट आमनेसामने
यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना हा हायव्होल्टेज असा आहे. हा सामना सीएसके विरुद्ध आरसीबी असा आहे. अर्थात धोनी विरुद्ध विराट असा हा थेट सामना असल्याने क्रिकेट चाहते या सामन्यासाठी उत्सूक आहेत. हा सामना बंगळुरुतील एन चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याचे जवळपास सर्व तिकीट बूक झाले आहेत. यावरुन पहिला सामना किती धमाकेदार असेल, याचा अंदाज येतो.
आरसीबी पहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत
चेन्नई सुपर किंग्सने गत मोसमात गुजरात टायटन्सचा अखेरच्या बॉलवर पराभव करुन पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने ट्रॉफी जिंकून मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक 5 वेळेस ट्रॉफी जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. त्यामुळे यंदा सीएसके ट्रॉफीचा सिक्सर मारण्यासाठी सज्ज आहे.
22 मार्चपासून ‘रन’संग्रामाला सुरुवात
Pitch pe toh Jasprit bowling karega Lekin ghar pe sirf JioCinema dekhega.
Aap bhi 22nd March ko JioCinema par #CSKvRCB ka poora mazaa lena, free mein!#TVDekhoTohAise#IPLonJioCinema, streaming free from 22nd March#IPL2024 #TataIPL pic.twitter.com/Ih4TV7tqIY
— JioCinema (@JioCinema) March 15, 2024
तर दुसऱ्या बाजूला आरसीबी गेल्या 16 वर्षांमध्ये एकूण 3 फायनल सामने खेळली आहे. मात्र आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. आरसीबी 2009, 2011 आणि 2016 साली फायनलमध्ये पोहचली. मात्र आरसीबी तिन्ही वेळेस अपयशी ठरली. त्यामुळे यंदा आरसीबीची पहिली ट्रॉफी जिंकून गेल्या 16 वर्षांची प्रतिक्षा संपवण्याचा प्रयत्न असणार आहे.
