हैदराबादच्या तडाखेदार बॅटिंगसमोर हार्दिक हतबल, रोहित धावला मदतीला, व्हीडिओ व्हायरल
Hardik Pandya and Rohit Sharma : रोहित शर्मा याने मुंबई इंडियन्स अडचणीत असताना कॅप्टन हार्दिक पंड्याला याला मदत केली. रोहितचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

कर्म कुणालाच चुकले नाहीत, असं म्हणतात. हे वाक्य मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याबाबत खरे ठरलेत. हार्दिक पंड्याने माजी कर्णधार रोहित शर्माला गुजरात टायटन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात फिल्डिंगसाठी बॉउंड्री लाईनवर पाठवलं. हार्दिक या दरम्यान रोहितसोबत जसा वागला त्यानंतर रोहितचे चाहते चांगलेच संतापले. रोहितच्या चाहत्यांनी हार्दिकचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला. हार्दिक जसा रोहितसोबत वागला त्याचंच फळ त्याला दुसऱ्याच सामन्यात परत मिळालंय, असं नेटकरी आता म्हणत आहेत.
हार्दिकने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगला बोलावलं. हैदराबादने या संधीचा चांगलाच फायदा घेतला. ट्रेव्हिस हेड याने 5 धावांवर मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेत 62 धावांची झंझावाती खेळी केली. तर अभिषेक शर्मा यानेही झोडून काढला. हैदराबादच्या वादळी बॅटिंगसमोर हार्दिक हतबल झाला. फिल्डिंग कशी लावावी? कुणाला बॉलिंग द्यावी? हे त्याला समजेना. रोहित अशावेळेस हार्दिकच्या मदतीला धावून आला. रोहितने फिल्डिंग सेट करायला मदत केली. यावेळेस रोहितने हार्दिकला बॉउंड्री लाईनवर जायला सांगितलं, असा दावा नेटकऱ्यांकडून केला जात आहे. हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. तसेच हार्दिकला रोहितसमोर झुकावंच लागलं, असंही नेटकरी म्हणत आहेत.
हार्दिक हतबल, रोहित धावला मदतीला
Rohit Sharma sent hardik pandya on the boundary line 😭😭🔥
This is peak cinema 😭😭🔥🔥pic.twitter.com/lR9uJNp4IW
— ᴘʀᴀᴛʜᴍᴇsʜ⁴⁵ (@45Fan_Prathmesh) March 27, 2024
हैदराबाद प्लेईंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि जयदेव उनाडकट.
मुंबई प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह आणि क्वेना माफाका.
