SRH vs RR Toss : राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, कॅप्टन संजू सॅमसनचा मोठा निर्णय

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Qualifier 2 Toss: हैदराबाज आणि राजस्थान हे दोन्ही संघ क्वालिफायर 2 आधी साखळी फेरीतील 50 व्या सामन्यात आमनेसामने होते. हैदराबादने तो सामना 1 धावेने जिंकला होता. आता दोन्ही संघात अंतिम फेरीसाठी चुरस आहे.

SRH vs RR Toss : राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, कॅप्टन संजू सॅमसनचा मोठा निर्णय
SRH vs RR tossImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 7:27 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अंतिम फेरीत पोहचण्यासाठी क्वालिफायर 2 सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात क्वालिफायर 2 सामना होत आहे. या सामन्यात पॅट कमिन्स सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्व करणार आहे. तर संजू सॅमसन याच्याकडे राजस्थान रॉयल्सची सूत्र आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता चेन्नईतील चेपॉक अर्थात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये टॉस पार पडला. राजस्थानने टॉस जिंकला. कॅप्टन संजू सॅमसन याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

आयपीएलच्या इतिहासात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एकूण 19 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. तर या हंगामात 50 व्या सामन्यात दोन्ही संघ भिडले होते. त्या सामन्यात हैदराबादने राजस्थानवर 1 धावेने थरारक विजय मिळवला होता. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत तुल्यबळ लढती झाल्या आहेत. दोन्ही संघात झालेल्या 19 पैकी 10 सामन्यात हैदराबाद विजयी झाली आहे. तर 9 वेळा राजस्थानने विजयी श्री मिळवली आहे.

कुणाला संधी कुणाला डच्चू?

राजस्थानने या निर्णायक आणि आरपारच्या लढाईसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कॅप्टन संजू सॅमसनने प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. संजून आपल्या त्याच 10 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर दुसऱ्या बाजूला सनरायजर्स हैदराबादने टीममध्ये 1 बदल केला आहे. विजयकांत व्यासकांत याच्या जागी माजी कर्णधार एडन मारक्रम याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच जयदेव उनाडकट याचं कमबॅक झालं आहे.

राजस्थानने टॉस जिंकला

हैदराबाद इम्पॅक्ट प्लेअर : उमरान मलिक, सनवीर सिंह, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे आणि शाहबाज अहमद

सनराइजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.

राजस्थान इम्पॅक्ट प्लेअर: शिमरॉन हेटमायर, नांद्रे बर्गर, शुभम दुबे, डोनोवन फरेरा आणि कुलदीप सेन.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयसवाल, टॉम कोहलर-कैडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमैन पॉवेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल.

Non Stop LIVE Update
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.