IPL 2025 CSK vs KKR Live Streaming : चेन्नई केकेआरविरुद्ध घरच्या मैदानात पराभवाची मालिका खंडीत करणार?
Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Streaming: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमात सलग 4 सामने गमावले आहेत. त्यामुळे चेन्नईसमोर केकेआरविरुद्ध घरच्या मैदानात विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा सहावा सामना आहे. अजिंक्य रहाणे याच्याकडे कोलकाताचं कर्णधारपद आहे. तर ऋतुराज गायकवाड याला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे उर्वरित हंगामात महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे चेन्नईच्या घरच्या मैदानात हा सामना होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नेहमीप्रमाणे यलो आर्मीचे समर्थक एमए चिदंबरम स्टेडियममध्ये उपस्थित असणार, यात काडीमात्र शंका नाही. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना केव्हा?
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना शुक्रवारी 11 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना कुठे?
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे आयोजित करण्यात आला आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
चेन्नई सुपर किंग्ज संघ: महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.
कोलकाता नाईट रायडर्स टीम: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिच नॉर्खिया, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया, चेतन साकारिया, रहमानउल्ला गुरबाज, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल आणि मोईन अली.
