IPL 2025 Final Toss : पंजाबने टॉस जिंकला, कॅप्टन श्रेयसचा फिल्डिंगचा निर्णय, आरसीबीला मोठा झटका
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Toss : पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पहिल्यांदाच आमनेसामने आहेत. तसेच दोन्ही संघांना एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील महाअंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. श्रेयस अय्यर याच्याकडे पंजाबच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं नेतृत्व करत आहे. या अंतिम सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. पंजाब किंग्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरसीबी पंजाबसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
प्लेइंग ईलेव्हनबाबत मोठा निर्णय
पंजाब किंग्सने अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार यानेही आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवत अंतिम 11 कायम ठेवली आहे. मात्र त्यानंतरही आरसीबीला मोठा झटका लागला आहे. आरसीबीचा स्टार आणि मॅचविनर खेळाडू टीम डेव्हिड याला दुखापतीमुळे महाअंतिम सामन्याला मुकावं लागलं आहे. डेव्हीडला याआधी हॅम्स्ट्रिंगमुळे 2 सामन्यांना मुकावं लागलं. त्यामुळे टीम अंतिम सामन्यापर्यंत फिट होईल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र तसं होऊ शकलेलं नाही.
आरसीबी-पंजाब दोन्ही संघांची आयपीएलच्या 18 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही चौथी वेळ ठरली आहे. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत 2 वेळा भिडले होते. तर क्वालिफायर-1 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने होते. आरसीबीने क्वालिफायर-1 मध्ये पंजाबचा धुव्वा उडवत पहिल्याच फेरीत फायनलमध्ये धडक दिली होती. तर पंजाबने क्वालिफायर-2 मध्ये मुंबईवर मात करत दुसऱ्या संधीकत फायनलमध्ये प्रवेश केला.
तर त्याआधी 18 आणि 20 एप्रिल रोजी दोन्ही संघ साखळी फेरीत भिडले होते. तेव्हा 18 एप्रिलला पंजाबने आरसीबीवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. तर 20 एप्रिलला आरसीबीने पंजाबचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत पहिल्या पराभवाची परतफेड केली होती. त्यामुळे आता कोणता संघ सामना जिंकून चॅम्पियन होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पंजाब टॉसचा बॉस
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL won the toss and elected to bowl first against @RCBTweets in the Grand #Final
Updates ▶ https://t.co/U5zvVhbXnQ#TATAIPL | #RCBvPBKS | #TheLastMile pic.twitter.com/OG9rob7n0U
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल आणि जोश हेजलवुड.
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, अजमतुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
