LSG vs MI Head to Head : मुंबईची लखनौ सुपर जायंट्ससमोर फ्लॉप कामगिरी, अशी आहे आकडेवारी
Lucknow Super Giants vs Mumbai Indians Head to Head Records : मुंबई इंडियन्सची आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध निराशाजनक कामगिरी राहिली आहे. लखनौच्या तुलनेत मुंबई आसपासही नाही. पाहा आकडे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 16 व्या सामन्यात शुक्रवारी 4 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मुंबई आणि लखनौ दोन्ही संघांचा हा चौथा सामना असणार आहे. मुंबईने 3 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर लखनौ सुपर जायंट्सनेही मुंबईप्रमाणे फक्त एकच सामना जिंकलाय. लखनौ पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये विजयासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या इतिहासात लखनौ मुंबईवर वरचढ राहिली आहे.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
लखनौ सुपर जायंट्स मुंबईवर वरचढ राहिली आहे. आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स दोन्ही संघ एकूण 6 वेळा आमनेसामने आले आहेत. लखनौने 6 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर मुंबईला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे मुंबईचा शुक्रवारी विजय मिळवून हा आकडा सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे.
रोहितच्या कामगिरीकडे लक्ष
दरम्यान लखनौविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या चाहत्यांचं रोहित शर्मा याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. रोहित शर्मा पहिल्या तिन्ही सामन्यांत अपयशी ठरला. त्यामुळे शुक्रवारी चाहत्यांना रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.
लखनौ सुपर जायंट्स संघ: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, राजवर्धन हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.
