AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 LSG vs MI Live Streaming : लखनौ घरच्या मैदानात मुंबईविरुद्ध भिडणार, पलटण जिंकणार की यजमान बाजी मारणार?

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Streaming: मुंबई इंडियन्स लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानात खेळणार आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील चौथा सामना असणार आहे.

IPL 2025 LSG vs MI Live Streaming : लखनौ घरच्या मैदानात मुंबईविरुद्ध भिडणार, पलटण जिंकणार की यजमान बाजी मारणार?
LSG VS MI Live STREAMING Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 03, 2025 | 8:36 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमात शु्क्रवारी 4 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंतकडे लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाची धुरा आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील चौथा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची या हंगामात सारखीच स्थिती आहे. मात्र घरच्या मैदानात सामना होणार असल्याने लखनौला क्रिकेट चाहत्यांचा पाठींबा असणार आहे. मुंबईने या हंगामात सलग 2 सामने गमावल्यानंतर केकेआरवर मात करत विजयाचं खातं उघडलं. तर लखनौची पराभवाने सुरुवात झाली. त्यानतंर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. मात्र लखनौने पुन्हा सामना गमावला. त्यामुळे लखनौचा विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असेल. तर मुंबई सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी तयारीने मैदानात उतरणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना केव्हा?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना शुक्रवारी 4 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिेकट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एप पाहता येईल.

मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.

लखनौ सुपर जायंट्स संघ: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आरएस हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.