PBKS vs LSG : पंजाबचा लखनौ सुपर जायंट्सवर 37 धावांनी विजय, पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप, मुंबईला झटका
Punjab Kings vs Lucknow Super Giants Match Result : पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सवर मात करण्यासह पॉइंट्स टेबलमधील आपलं स्थान सुधारलं आहे. पंजाबने मुंबईला मागे टाकत प्लेऑफसाठी दावा आणखी मजबूत केला आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 54 व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सवर 37 धावांनी विजय मिळवला आहे. पंजाबने लखनौसमोर धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये विजयासाठी 237 धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. मात्र लखनौला प्रत्युत्तरात 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 199 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबने अशाप्रकारे हा सामना जिंकला. पंजाबचा हा या मोसमातील एकूण सातवा तर लखनौ सुपर जायंट्स विरुद्धचा दुसरा विजय ठरला. पंजाबने याआधी 1 एप्रिलला लखनौवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. पंजाबने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईला पछाडत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
बदोनी आणि समदने लाज राखली
लखनौच्या टॉप ऑर्डरने चाहत्यांची निराशा केली. मिचेल मार्श याला भोपळाही फोडता आला नाही. एडन मारक्रम याने 13 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. निकोलस पूरन याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र पूरनने 6 धावा केल्या आणि आऊट झाला. कर्णधार ऋषभ पंत या सामन्यातही अपयशी ठरला. पंत 18 रन्सवर आऊट झाला. डेव्हिड मिलर याने 11 रन्स केल्या. त्यानंतर आयुष बदोनी आणि अब्दुल समद या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 81 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानतंर अब्दुल समद आऊट झाला.
अब्दुल समद याने 24 बॉलमध्ये 45 रन्स केल्या. समद आऊट होताच लखनौच्या विजयाची शक्यता आणखी कमी झाली. समदनंतर आयुष बदोनी हा देखील माघारी परतला. बदोनीने लखनौसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. बदोनीने 40 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 फोरसह 74 रन्स केल्या. तर प्रिन्स यादव 1 रनवर नॉट आऊट राहिला. पंजाबसाठी अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. अझमतुल्लाह ओमरझई याने दोघांना आऊट केलं. तर मार्को यान्सेन आणि युझवेंद्र चहल या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
पंजाबची बॅटिंग
त्याआधी लखनौने टॉस गमावून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 236 रन्स केल्या. पंजाबसाठी प्रभसिमरन सिंह याने सर्वाधिक 91 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार श्रेयस अय्यरने 45 रन्स केल्या. तर शशांक सिंह याने नाबाद 33 आणि जोश इंग्लिसने 30 धावांचं योगदान दिलं. नेहल वढेरा याने 16 तर मार्कस स्टोयनिसने नाबाद 15 धावा केल्या. त्याआधी प्रियांश आर्या 1 धाव करुन आऊट झाला. लखनौकडून आकाश महाराज सिंह आणि दिग्वेश राठी या दौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर प्रिंस यादवने 1 विकेट मिळवली.
पंजाबचा मोठा विजय
Stepped up. Stood tall. Delivered. 🫡
Prabhsimran Singh’s brilliance with the bat ensured a Player of the Match award & a much-needed win for #PBKS ❤️
Relive his innings ▶ https://t.co/nOODb3CMfY#TATAIPL | #PBKSvLSG | @PunjabKingsIPL pic.twitter.com/rdMGDhG05C
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
पंजाब दुसऱ्या स्थानी
दरम्यान पंजाबने या विजयासह मुंबईला मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली. पंजाबच्या खात्यात 11 सामन्यांनंतर 15 पॉइंट्स झाले आहेत. पंजाबचा एक सामना हा पावसामुळे रद्द झाला होता. तर पंजाबला 3 सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. पंजाबचा नेट रनरेट हा +0.376 असा आहे.
