शर्माना मत..! हैदराबादच्या अभिषेकचा झंझावात, शतकी खेळीनंतर चिठ्ठीवर लिहिलेला मेसेज दाखवला Video
आयपीएल 2025 स्पर्धेच्या 27व्या सामन्यात षटकार आणि चौकारांचा आतषबाजी दिसली. अभिषेक शर्माने 245 धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्सच्या गोलंदाजांना फोडून काढलं. समोर कोणताही गोलंदाज आला तरी त्याची स्थिती एकदम वाईट करून टाकली. शतकी खेळीनंतर त्याने खिशातून एक चिठ्ठी काढली आणि..

आयपीएल 2025 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक अंदाज दिसला. स्पर्धेतील 27व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातन नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 245 धावा केल्या आणि विजयासाठी 246 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान सनरायझर्स हैदराबादसाठी कठीण होतं. पण अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड तयारीसह उतरले होते. त्यांनी या धावांचा पाठलाग करताना कोणालाच सोडलं नाही. जो गोलंदाज समोर येईल त्याची पाठ फोडून काढली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 171 धावांची भागीदारी केली. 12.2 षटकात सनरायझर्स हैदराबादची पहिली विकेट पडली. ट्रेव्हिस हेड 37 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकार मारून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्माच्या झंझावात सुरुच होता. सनरायझर्स हैदराबादने 18.3 षटकात 1 गडी गमवून दिलेलं आव्हान गाठलं.
अभिषेक शर्माने 40 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने 100 धावांची खेळी केली. त्याचा झंझावात पाहून पंजाब किंग्सच्या गोलंदाजांच्या कपळावर आठ्या पडल्या होत्या. अभिषेक शर्माने 54 चेंडूत 14 चौकार आणि 10 षटकार मारत 141 धावा केल्या. 23 चेंडूत 24 धावांची गरज असताना अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या खेळाडूच्या यादीत सहावा खेळाडू आहे. अभिषेक शर्माने शतक ठोकल्यानंतर खिशातून एक चिठ्ठी काढली आणि ड्रेसिंग रुमच्या दिशेने दाखवली. त्यावर मेसेज लिहिला होता की, ‘This One Is For Orange Army’. अभिषेक शर्माने आयपीएल 2025 स्पर्धेत शतक ठोकणारा तिसरा फलंदाज आहे. यापूर्वी इशान किशन, प्रियांश आर्याने शतक ठोकलं आहे.
ORANGE ARMY IS ONE OF THE BEST FANS EVER..!!!!
– They deseve this moment ❤️ pic.twitter.com/8Ks5LprAyQ
— Johns. (@CricCrazyJohns) April 12, 2025
दोन्ही संघांची प्लेइंग 11
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी, एशान मलिंगा.
