AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 Playoffs Venue : क्रिकेट चाहत्यांचा विरोध झुगारुन मोठा निर्णय, या ठिकाणी होणार आयपीएल फायनल

आयपीएल 2025 स्पर्धेचं नवं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचं ठिकाण जाहीर केलं नव्हतं. आता बीसीसीआयच्या जोर बैठका पार पडल्यानंतर नवं ठिकाण जाहीर करण्यात आलं आहे. यावेळी अंतिम सामना ऐतिहासिक मैदानावर होणार आहे.

IPL 2025 Playoffs Venue :  क्रिकेट चाहत्यांचा विरोध झुगारुन मोठा निर्णय, या ठिकाणी होणार आयपीएल फायनल
आयपीएल 2025 स्पर्धाImage Credit source: PTI
| Updated on: May 20, 2025 | 5:38 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीमुळे आयपीएल स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. सामन्यांचं ठिकाणंही यावेळी बदलण्यात आली. मात्र प्लेऑफ आणि अंतिम फेरीची ठिकाणं काही जाहीर केली नव्हती. यापूर्वी अंतिम फेरीचा समना 25 मे रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार होता. पण आता हा सामना 3 जूनला होणार आहे. तसेच नव्या ठिकाणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममद्ये या पर्वाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. तर क्वॉलिफायर 2 स्पर्धेसाठीही या मैदानाची निवड केली गेली आहे. यासह मुल्लांपूरच्या महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये क्वॉलिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे.

नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. यापूर्वी आयपीएलच्या महत्त्वपूर्ण सामन्यांचं यजमानपद भूषवलं आहे. 2022 मध्ये याच मैदानात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत करून जेतेपद मिळवलं होतं. तर 2023 मध्ये पावसामुळे अंतिम सामना दोन दिवस चालला होता. तेव्हा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे कोलकात्याच्या ईडन गार्डनऐवजी अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. यापूर्वी अंतिम फेरीचं ठिकाण शिफ्ट केल्याने क्रीडारसिकांनी कोलकात्यात आंदोलन केलं होतं. तसेच अंतिम फेरीचा सामना ईडन गार्डनवरच व्हावा अशी विनंती केली होती. पण आता हा सामना तिथे होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

आयपीएलच्या प्लेऑफमध्ये आतापर्यंत तीन संघांनी जागा मिळवली आहे. यात गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांचा समावेश आहे. चौथ्या संघासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरस आहे. या दोन पैकी एक संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवणार आहे. विशेष म्हणजे प्लेऑफचा सामना मुंबईत देखील होणार नाही. त्यामुळे मुंबईकर क्रीडारसिकांमध्येही चलबिचल आहे. यंदा प्लेऑफमध्ये पंजाब किंग्स आणि आरसीबीने जागा मिळवली आहे. हे दोन्ही संघ अजूनही जेतेपदापासून वंचित आहेत. त्यामुळे यंदा नवा विजेता मिळणार का? याची उत्सुकता देखील आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.