AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 Points Table : गुजरातकडून मिळालेल्या पराभवानंतर आरसीबीचं पहिलं स्थान गेलं, अशी झाली उलथापालथ

आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी गाडी रुळावरून खाली घसरली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 169 धावांवर रोखलं. हे आव्हान गुजरात टायटन्सने 8 गडी राखून पराभव केला.

IPL 2025 Points Table : गुजरातकडून मिळालेल्या पराभवानंतर आरसीबीचं पहिलं स्थान गेलं, अशी झाली उलथापालथ
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 02, 2025 | 11:13 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं. पण तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला गुजरात टायटन्स पराभूत केलं. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर आरसीबीला प्रथम फलंदाजी करावी लागली. पॉवर प्लेमध्येच आरसीबीचे दिग्गज खेळाडू तंबूत परतले होते. त्यामुळे धावगती मंदावली होती. आरसीबीने लिविंगस्टोनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकात 8 गडी गमवून कसं बस 169 धावांपर्यंत मजल मारली. तसेच गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गुजरात टायटन्सने 2 गडी गमवून पूर्ण केलं. कर्णधार शुबमन गिल स्वस्तात बाद झाल्यानंतर साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी मोर्चा सांभाळला. जोस बटलरने अर्धशतक ठोकलं आणि विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं. गुजरातने 8 विकेट आणि 13 चेंडू राखून आरसीबीचा पराभव केला. या पराभवामुळे पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दोन सामन्यात विजयानंतर 4 गुण आणि +2.266 नेट रनरेट होता. तसेच गुणतालिकेत पहिलं स्थान होतं. पण गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्याने दोन गुण तर गेले. दुसरं नेट रनरेटमध्ये मोठं नुकसान झालं आहे. आता आरसीबीचे 4 गुण असून नेट रनरेट हा +1.149 इतका आहे. आरसीबीची तिसर्‍या स्थानी घसरण झाली आहे. आरसीबीच्या पराभवामुळे पंजाब किंग्सला फायदा झाला आहे. पंजाबचा संघ 4 गुण आणि +1.485 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर पोहोचल आहे. दिल्ली कॅपिटल्स 4 गुण आणि +1.320 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

गुजरात टायटन्सने 4 गुण आणि +0.807 नेट रनरेटसह चौथ्या, मुंबई इंडियन्स 2 गुण +0.309 नेट रनरेटसह पाचव्या, लखनौ सुपर जायंट्स 2 गुण आणि -0.150 नेट रनरेटसह सहाव्या, चेन्नई सुपर किंग्स 2 गुण आणि -0.771 नेट रनरेटसह सातव्या, सनरायझर्स हैदराबाद 2 गुण आणि 0.871 नेट रनरेटसह आठव्या, राजस्थान रॉयल्स 2 गुण आणि -1.112 नेट रनरेटसह नवव्या आणि कोलकाता नाईट रायडर्स 2 गुण आणि -1.428 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन