AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 RR vs KKR Live Streaming : राजस्थान-केकेआरचा दुसरा सामना, कोण उघडणार विजयाचं खातं?

Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders Live Streaming : कोलकाता आणि राजस्थान या दोन्ही संघांचा या मोसमातील हा दुसरा सामना आहे. दोन्ही संघांची या स्पर्धेत पराभवाने सुरुवात झालीय. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघाच रस्सीखेंच पाहायला मिळणार आहे.

IPL 2025 RR vs KKR Live Streaming : राजस्थान-केकेआरचा दुसरा सामना, कोण उघडणार विजयाचं खातं?
RR vs KKR IPL 2025 PreviewImage Credit source: IPL/BCCI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 25, 2025 | 10:57 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) पहिली फेरी पूर्ण झाली आहे. एकूण 10 संघांनी प्रत्येकी 1-1 सामना खेळला आहे. आता या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील सहाव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा या मोसमातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांची या हंगामात पराभवाने सुरुवात झालीय. बंगळुरुने कोलकाताला 22 मार्चला पराभूत केलं. तर हैदराबादने राजस्थानवर 23 मार्चवर विजय मिळवला. आहे. या सामन्यात एका संघाचं विजयाचं खात उघडेल. तर एका संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात विजयाचं खातं उघडण्याची चुरस पाहायला मिळणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना केव्हा?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना बुधवारी 26 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना कुठे?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना बारसपारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आला आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहता येईल.

कोलकाता नाईट रायडर्स टीम: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिच नॉर्खिया, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया, चेतन साकारिया, रहमानउल्ला गुरबाज, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल आणि मोईन अली.

राजस्थान रॉयल्स टीम : यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी, संजू सॅमसन, कुणाल सिंग राठौर, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, युधवीर सिंग चरक, अशोक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी.

Follow Us
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर