AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi : पडलेला चेहरा आणि डोळ्यात अश्रू, डेब्यूटंट वैभव सूर्यवंशी रडला! व्हीडिओ व्हायरल

Vaibhav Suryavanshi Emotional : 14 वर्षीय युवा वैभव सूर्यवंशी याने आयपीएल कारकीर्दीची अप्रतिम सुरुवात केली. मात्र वैभव आऊट झाल्यानंतर मैदानाबाहेर जाताना भावूक झाला. वैभवचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vaibhav Suryavanshi : पडलेला चेहरा आणि डोळ्यात अश्रू, डेब्यूटंट वैभव सूर्यवंशी रडला! व्हीडिओ व्हायरल
Vaibhav Suryavanshi Emotional RR vs LSG IPL 2025Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 20, 2025 | 1:17 AM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 36 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने शेवटच्या बॉलवर राजस्थान रॉयल्सवर 2 धावांनी मात करत विजय मिळवला. राजस्थानला 181 धावांचं आव्हान मिळालं होतं. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 9 तर शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज होती. मात्र आवेश खान याने चिवट बॉलिंग केली आणि राजस्थानच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला. लखनौने यासह या मोसमातील पाचवा विजय मिळवला. तर राजस्थानला सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएल इतिहासातील सर्वात युवा डेब्यूटंट 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने या सामन्यात साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. वैभवने पदार्पणात तडाखेदार खेळी करत 34 धावा केल्या. मात्र वैभव आऊट झाल्यानंतर त्याच्या डोळ्यात अश्रू आले. वैभवचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यशस्वी जयस्वालसह अप्रतिम सलामी भागीदारी

वैभव सूर्यवंशी याला दुखापतग्रस्त संजू सॅमसन याच्या जागी संधी देण्यात आली. वैभव इमपॅक्ट प्लेअर म्हणून यशस्वी जयस्वालसह ओपनिंगला आला. वैभवने त्याच्या डावातील पहिल्याच बॉलवर शार्दूल ठाकुरला षटकार खेचला आणि साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यशस्वी आणि वैभव या 85 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर वैभव आऊट झाला. वैभवने पदार्पणातच वादळी खेळीचा नजारा दाखवला आणि टीम मॅनेजमेंटचा विश्वास सार्थ ठरवला. वैभवने फक्त 20 बॉलमध्ये 170 च्या स्ट्राईक रेटने 34 रन्स केल्या. वैभवच्या या खेळीत 3 गगनचुंबी षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता.

वैभव सूर्यवंशी भावूक

लखनौचा कर्णधार ऋषभ पंत याने वैभवला स्टंपिंग केलं आणि त्याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. वैभव मैदानाबाहेर जाताना भावूक झाला. वैभव मैदानात एक स्वप्न घेऊन आला होता. वैभव ज्या पद्धतीने खेळत होता त्यानुसार त्याला 181 धावांचं आव्हान सहज पार करु हा विश्वास होता. मात्र तसं होऊ शकलं नाही. वैभवला आऊट होऊन मैदानाबाहेर जाताना भावना अनावर झाल्या. वैभवच्या डोळ्यात अश्रू तरळले. वैभवचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. वैभवला या सामन्यात आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र वैभवने 34 धावांसह आपली छाप सोडली.

बिच्चारा, पोरगं रडलं रे!

लखनौची पॉइंट्स टेबलमध्ये उडी

दरम्यान लखनौचे या विजयासह 10 पॉइंट्स झाले. लखनौ या मोसमात 5 सामने जिंकणारी चौथी टीम ठरली. तसेच लखनौने पॉइंट्स टेबलमध्ये एका स्थानाने उडी घेतली. लखनौ ताज्या आकडेवारीनुसार चौथ्या स्थानी पोहचली आहे. लखनौ सामन्याआधी पाचव्या क्रमांकावर होती.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...