
भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव निवळल्यानंतर आयपीएल स्पर्धेला त्याच जोशात सुरुवात झाली. मात्र शनिवारी 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यानंतर आता रविवारी 18 मे रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. सामन्याला 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजून 25 मिनिटांनी जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये राष्ट्रगीत पार पडलं. राष्ट्रगीताद्वारे दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आणि क्रिकेट चाहत्यांनी भारतीय सैन्य दलाचे आभार मानले.
आयपीएल 2025 स्पर्धा पुन्हा सुरु झाल्यानंतर बीसीसीआयने सैन्यदलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. स्थगितीनंतरच्या पहिल्या सामन्यानंतर सैन्यदलाचे मनापासून आभार मानले. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर मैदानात उभं राहून सैन्यदलाला मानवंदना दिली. या युद्धजन्य स्थितीतून बाहेर काढण्यात सैन्यदलाने भूमिका महत्त्वाची होती. कारण भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावला. तसेच मानवतेचं रक्षण केलं. संपूर्ण जगभर भारताच्या या कृतीचं कौतुक होत आहे. बीसीसीआयने भारतीय सैन्यदलाला मानवंदना दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी राष्ट्रगीत गायलं गेलं. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाचा ऊर भरून येत आहे.
राष्ट्रगीतातील प्रत्येक शब्दामुळे भारतीयांची छाती अभिमानाने फुगत होती. सैन्यदल आहे म्हणून आपण चांगलं आयुष्य जगतो अशी भावना प्रत्येकात जाणवत होती. पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. भारतीय सैन्य दलाने या भ्याड हल्ल्याचा बदल ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. यात दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचा खात्मा झाला. त्यानंतर दहशतवाद पुरस्कृत पाकिस्तान सरकारने भारतावर हल्ला करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. भारतीय सैन्याने प्रत्येक हल्ल्याच जशास तसं उत्तर दिलं.
भारतीय सैन्यदलाला सामन्याआधी सलाम
Grateful to the Armed Forces.
Jai Hind 🇮🇳#TATAIPL | #RRvPBKS pic.twitter.com/OOid23RDuZ
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
दोन्ही देशातील तणावपूर्ण स्थितीनंतर 8 मे रोजी धरमशाळा येथे आोयजित दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना सुरुक्षिततेच्या कारणामुळे स्थगित करम्यात आला. त्यानंतर बीसीसीआयने 9 मे रोजी उर्वरित सामने आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले. बीसीसीआयने सैन्य दलाच्या पाठीशी असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे पुढे काय होईल हे कोणालाच माहिती नव्हतं.
दहशतवाद पुरस्कृत पाकिस्तान भारतावर वारंवार हल्ले करत होता. भारताने प्रत्येक हल्ल्याचे प्रत्युत्तर दिलं. इतकंच काय तर पाकिस्तानला दोन दिवसातच गुडघे टेकण्यास भाग पाडलं. पाकिस्तानने अमेरिकेकडे दया याचना केली. तसेच पाकिस्तान उच्च अधिकाऱ्यांनी भारतासोबत दयेची भीक मागितली. यानंतर भारताने आमचा लढा हा फक्त दहशतवादाशी असल्याचं स्पष्ट केलं आणि सीझफायरला हिरवा कंदील दिला.
भारत पाकिस्तान यांच्यातील स्थिती निवळल्यानंतर 12 मे रोजी बीसीसीआयने उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानंतर आता 17 मे ते 3 जून दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा 25 मे रोजी संपणार होती.