RR vs RCB : यशस्वी जयस्वालचा तडाखा, आरसीबीसमोर 174 रन्सचं टार्गेट, घराबाहेर सलग चौथा विजय मिळवणार?
Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru 1st Innings Highlights : यशस्वी जयस्वाल याने केलेल्या 75 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 20 ओव्हरमध्ये 173 धावा केल्या आहेत.

राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 28 व्या सामन्यात घरच्या मैदानात खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 174 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 174 धावा केल्या. राजस्थानसाठी ओपनर यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक धावा केल्या रियान पराग आणि ध्रुव जुरेल या दोघांनी 30 पेक्षा अधिक धावा करत राजस्थानला 170 पोहचवण्यात योगदान दिलं. तर आरसीबीकडून 4 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. आरसीबीचा हा या मोसमातील सहावा सामना आहे. आरसीबीने घराबाहेरच तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आरसीबी ही घराबाहेरील विजयाची मालिका राजस्थानविरुद्ध कायम राखणार का? हे थोड्याच वेळाच स्पष्ट होईल.
राजस्थानची बॅटिंग
राजस्थानसाठी यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक धावा जोडल्या. यशस्वीने 47 बॉलमध्ये 159.57 च्या स्ट्राईक रेटने 75 रन्स केल्या. यशस्वीने या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार लगावले. कर्णधार संजू सॅमसन याने चाहत्यांची निराशा केली. संजू 15 धावा करुन आऊट झाला. रियान पराग याने 22 बॉलमध्ये 3 फोर आणि 1 सिक्ससह 30 रन्स केल्या. शिमरॉन हेटमायर 9 धावा करुन आऊट झाला. तर ध्रुव जुरेल आणि नितीश राणा जोडी नाबाद परतली. ध्रुवने 23 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 35 रन्स केल्या. तर नितीश राणा याने 4 धावांची भर घातली.
तर आरसीबीकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी चौघांनाच विकेट घेण्यात यश आलं. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड आणि कृणाल पंड्या या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
आरसीबीसमोर 174 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Innings Break!#RR post a competitive 1⃣7⃣3⃣ / 4⃣ on the back of Yashasvi Jaiswal’s impressive 75(47) 👌
Will #RCB chase this down and seal 2⃣ points? 🤔
Updates ▶ https://t.co/rqkY49M8lt#TATAIPL | #RRvRCB | @rajasthanroyals | @RCBTweets pic.twitter.com/BHf8fMx4qR
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2025
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कॅप्टन), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा आणि यश दयाल.
