IPL 2025 SRH vs LSG Live Streaming: लखनौच्या गोलंदाजांसमोर हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान, सामना कुठे?
Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Live Streaming : लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांसमोर सनरायजर्स हैदराबादच्या स्फोटक त्रिकुटाला रोखण्याचं आव्हान असणार आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 7 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स आमनेसामने असणार आहेत. पॅट कमिसन्स हैदराबादचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंत लखनौचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील दुसरा सामना असणार आहे. हैदराबादने या हंगामात विजयी सलामी दिली आहे. तर दिल्लीने लखनौचा पराभव करत आपल्या मोहिमेची विजयाने सुरुवात केली. त्यामुळे एका बाजूला लखनौसमोर विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला हैदराबाद सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे.
लखनौसमोर हैदराबादच्या त्रिकुटाला रोखण्याचं आव्हान
हैदराबादने या हंगामातील त्यांच्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध 286 धावांचा डोंगर उभा केला होता. हैदराबाद या सामन्यात 300 धावा करण्यापासून फक्त 14 धावा दूर होती. त्यामुळे हैदराबाद लखनौविरुद्ध 300 पार मजल मारण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरणार आहे. हैदराबादला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखायचं असेल तर लखनौला त्यांच्या त्रिकुटाला वेळीच बाद करावं लागेल. लखनौसमोर ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन या तिघांना रोखण्याचं आव्हान असणार आहे. आता यात लखनौला किती यश येतं? हे सामन्यादरम्यानच समजेल.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना केव्हा?
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना गुरुवारी 27 मार्चला खेळवण्यात येणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना कुठे?
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजा टॉस होईल.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्टस नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल. तसेच टीव्ही9 मराठी वेबसाईटवर सामन्याचे प्रत्येक अपडेट्स जाणून घेता येतील.
सनरायझर्स हैदराबाद टीम: अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, ॲडम झाम्पा, सचिन बेबी, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, विआन मुल्डर, राहुल चहर, अथर्व तायडे, एशान मलिंगा आणि कामिंदू मेंडिस.
लखनौ सुपर जायंट्स टीम: एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड मिलर, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव, मणिमरण सिद्धार्थ, अब्दुल समद, हिम्मत सिंग, राजवर्धन हंगरगेकर, आकाश महाराज सिंग, आवेश खान, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, आकाश दीप, मयंक यादव, शामर जोसेफ आणि अर्शिन कुलकर्णी.