दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव होताच हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स संतापला, म्हणाला पुढच्या सामन्यात…

आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दहशत निर्माण करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा रंग दोन सामन्यात उडाला आहे. लखनौ सुपर जायंट्सनंतर दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. सलग दोन पराभवानंतर पॅट कमिन्सने चुकांचा पाढा वाचला. तसेच पुढच्या सामन्याआधी ताकीदही देऊन टाकली.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव होताच हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स संतापला, म्हणाला पुढच्या सामन्यात...
Image Credit source: video grab
| Updated on: Mar 30, 2025 | 7:19 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्यानंतर आता बलाढ्य बॅटिंग लाइनअप असलेल्या सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवला आहे. नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोठी धावसंख्या करण्याचा लक्ष्य ठेवून रणनिती आखली होती. पण दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीपुढे सर्वकाही फेल गेलं. दिल्लीच्या मिचेल स्टार्कने हैदराबादचा निम्मा संघ तंबूत पाठवला. 3.4 षटकात फक्त 35 धावा देत 5 गडी बाद केले. तर विजयासाठी दिलेल्या 164 धावा दिल्ली कॅपिटल्सने 16 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. 24 चेंडू राखून विजय मिळवल्याने दिल्ली कॅपिटल्सला दोन गुणांसह नेट रनरेटमध्येही फायदा झाला आहे. तर सनरायझर्स हैदराबादचं मोठं नुकसान झालं आहे.

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, आम्हाला खेळात यश मिळाले नाही, आम्हाला तितक्या धावा करता आल्या नाहीत. काही चुकीचे शॉट्स झेल होतात. पण 24 चेंडू राखून जिंकले असले तरी मला वाटत नाही की फार मोठा फरक आहे. हा फरक पुढे भरून काढता येईल. पण गेल्या दोन सामन्यांमध्ये सर्वकाही आपल्या मनासारखे झाले नाही. आपण मागे वळून पाहू शकतो. आणि वेगवेगळ्या पर्यायांबद्दल विचार करू शकतो.’

सामना गमवल्याने गुणतालिकेत फटका बसला आहे आणि पुढे फटका बसेल का? तेव्हा पॅट कमिन्सने सांगितलं की, ‘दोन गुणांनी मागे पडण्याची काळजी करणे खूप लवकर होईल. आशा आहे की आपण पुढे परत येऊ, पण मी म्हंटल्याप्रमाणे, आम्हाला आमच्या काही पर्यायांवर एक नजर टाकावी लागेल.’

सनरायझर्स हैदराबादचा पुढचा सामना कोलकाता नाईट रायडर्स होणार आहे. मागच्या पर्वात अंतिम फेरीत कोलकात्याने हैदराबादला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे हा सामना क्रीडाप्रेमींसाठी एक पर्वणी असेल. 3 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहेत.