AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफमध्ये पोहोचणार! नितीश रेड्डीने सांगितलं कसं ते…

आयपीएल 2025 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादची कामगिरी सुमार राहिली आहेत. आतापर्यंत खेळलेल्या नऊ पैकी 3 सामन्यात विजय मिळवत 6 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. असं असताना अष्टपैलू नितीश रेड्डीने सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल असं गणित मांडलं आहे.

IPL 2025 : सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफमध्ये पोहोचणार! नितीश रेड्डीने सांगितलं कसं ते...
नितीश कुमार रेड्डीImage Credit source: PTI
| Updated on: Apr 26, 2025 | 7:24 PM
Share

आयपीएल 2025 सर्वात आक्रमक खेळाडूंचा भरणा असलेला संघ सनरायझर्स हैदराबाद आहे. पण असं असूनही सनरायझर्स हैदराबादची स्पर्धेतील कामगिरी सुमार राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यापैकी फक्त 3 सामन्यात विजय मिळवता आला आहे. यासह ऑरेंज आर्मीच्या पारड्यात 6 गुण जमा झाले असून गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. मागच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला. चेन्नई सुपर किंग्सने 19.5 षटकात 154 धावा केल्या आणि विजयासाठी 155 धावांचं आव्हान दिलं. सनरायझर्स हैदराबादने 18.4 षटकात 5 गडी गमवून हे आव्हान गाठलं. या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादचं प्लेऑफच्या आशा काही अंशी टिकून आहेत. सनरायझर्स हैदाराबादचा अष्टपैलू खेळाडूने संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल असं भाकीत केलं आहे. यासाठी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं उदाहरण दिलं आहे.

सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डीने मागच्या पर्वाचं उदाहरण देताना सांगितलं की, ‘मागच्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शेवटचे सर्व सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. आम्हीही तसाच कारनामा करू शकतो.’ मागच्या पर्वात आरसीबीने सलग सहा सामन्यात विजय मिळवून प्लेऑफमध्ये जागा पक्की केली होती. नितीश रेड्डीने सांगितलं की, ‘टीममधील प्रत्येक खेळाडू सामना जिंकण्यासाठी 100 टक्के योगदान देईल.’ नितीश कुमारने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा विजय खूपच महत्त्वाचा होता हे देखील सांगितलं.

नितीश कुमार रेड्डीने कामिंदु मेंडिससोबत केलेल्या भागीदारीबाबत सांगितलं की, ‘आ्म्ही दोघं मोठे शॉट्स खेळण्याऐवजी एकेरी-दुहेरी धावांवर लक्ष केंद्रीत केलं. मोठी बाउंड्री लाइन असल्याने दोन-दोन धावा घेणं सोपं झालं होतं. त्यामुळे आम्ही आरामात लक्ष्य गाठू शकलो.’ सनरायझर्स हैदराबादचा पुढचा सामना 2 मे रोजी गुजरात जायंट्सशी, 5 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सशी, 10 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सशी, 13 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी आणि 18 मे रोजी लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. खरं तर हे पाचही संघ गुणतालिकेत टॉपला असून प्लेऑफच्या शर्यतीत आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ या संघांचं गणित बिघडवू शकतो.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय