AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : आरसीबीच्या ताफ्यात विराट कोहलीची ‘रॉयल’ एन्ट्री! पाहा व्हिडीओ

आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतील पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. पण आरबीसीच्या ताफ्याला किंग कोहलीची प्रतीक्षा होती. अखेर प्रतीक्षा संपली असून कोहलीच्या आगमनाने आरसीबीच्या ताफ्यात उत्साहाचं वातावरण आहे.

IPL 2025 : आरसीबीच्या ताफ्यात विराट कोहलीची 'रॉयल' एन्ट्री! पाहा व्हिडीओ
| Updated on: Mar 15, 2025 | 5:59 PM
Share

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक फॅन बेस असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अजून एकही जेतेपद मिळालेलं नाही. पण दरवेळी त्याच प्रतीक्षेत संघ आपली कामगिरी करत असतो. आता आयपीएलच्या 18व्या पर्वात ही प्रतीक्षा पूर्ण होणार का? याकडे लक्ष लागून आहे. आरसीबी संघ या पर्वात रजत पाटीदारच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून सराव शिबिराचे आयोजन केलं असून सराव सुरु झाला आहे.कोहलीच्या अनुपस्थितीत आरसीबीने उर्वरित खेळाडूंसोबत सराव सुरू केला होता. आयपीएल स्पर्धेची सुरुवात 22 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होईल. असं असताना विराट कोहलीने शिबिरात एन्ट्री मारली आहे. पहिल्या सामन्यासाठी फक्त एक आठवडा शिल्लक असताना किंग कोहली रेड आर्मीमध्ये सामील झाला आहे. आरसीबी फ्रँचायझीने त्यांच्या सोशल मीडियावर आगमनाचा व्हिडिओ शेअर केला.

चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडियासोबत दुबईमध्ये असलेला विराट कोहली काही दिवसांपूर्वीच भारतात आला होता. पण आरसीबीच्या सराव शिबिरात गैरहजर राहिला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोहलीने उत्तम फॉर्ममध्ये खेळला. त्याने पाच सामन्यांमध्ये 54.50 च्या सरासरीने 218 धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट होते. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने नाबाद शतक झळकावले आणि संघाला विजय मिळवून दिला. यानंतर, कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात 84 धावा करत पुन्हा संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

आयपीएल 2025 साठी आरसीबी खेळाडूंची यादी

फलंदाज: विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक छिकारा अष्टपैलू:  लियाम लिव्हिंगस्टोन, कृणाल पांड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मनोज भंडागे, जेकब बेथेल गोलंदाज: जोश हेजलवूड, रसिक दार, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, यश दयाल

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.