AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : मुंबई इंडियन्ससाठी धोक्याची घंटा! प्लेऑफच्या शर्यतीबाबत दोन सामने ठरवणार काय ते

आयपीएल 2025 स्पर्धेत प्लेऑफचं गणित अजून कोणत्याही संघांने सोडवलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. काहीही होऊ शकतं अशी स्थिती सध्या आहे. मुंबई इंडियन्स गणितही दोन सामन्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. चला जाणून घेऊयात काय ते...

IPL 2025 : मुंबई इंडियन्ससाठी धोक्याची घंटा! प्लेऑफच्या शर्यतीबाबत दोन सामने ठरवणार काय ते
मुंबई इंडियन्स Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 28, 2025 | 6:04 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेची रंगत 46 सामन्यानंतर वाढली आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण अजूनही प्लेऑफचं गणित कोणत्याही संघाला सोडवता आलेलं नाही. प्रत्येक सामन्यानंतर ही चुरस वाढताना दिसत आहे. मुंबई इंडियन्स संघाचंही काहीसं तसंच आहे. मुंबई इंडिन्सने या स्पर्धेतील सुरुवात पराभवाने केली होती. पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारवा लागला. त्यानंतर कोलकात्याला पराभूत करून कमबॅक केलं. मात्र त्यानंतरच्या दोन सामन्यात पुन्हा पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे मुंबईचं या स्पर्धेत काही खरं नाही असंच वाटत होतं. पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने विजयी पंच मारला. तसेच 12 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आता मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित चार पैकी दोन सामने महत्त्वाचे आहेत. या दोन सामन्यात विजय मिळवला तरच मुंबईला प्लेऑफचं तिकीट मिळेल. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

मुंबई इंडियन्सचा 11वा सामना राजस्थान रॉयल्ससोबत 1 मे रोजी होणार आहे. त्यानंतर 6 मे रोजी गुजरात टायटन्स समोर असेल. 11 मे रोजी पंजाब किंग्सशी आमनासामना होईल. तर 15 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सशी लढत होणार आहे. यापैकी पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे हे तीन सामने प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे ठरणार आहे. पण मुंबई इंडियन्सला प्लेऑफसाठी चार पैकी दोन सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. कारण दोन विजयानंतर 16 गुण होतील आणि प्लेऑफसाठी हे गुण सुरक्षित मानले जातात.

मुंबई इंडियन्सचा आतापर्यंत प्रवास

  • पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 4 विकेट आणि 5 चेंडू राखून पराभूत केलं. या सामन्याचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे होतं. मुंबईने विजयासाठी 156 धावा दिल्या होत्या. चेन्नईने 19.1 षटकात हे आव्हान पूर्ण केलं.
  • दुसऱ्या सामन्यात गुजरातने 36 धावांनी मुंबईचा धुव्वा उडवला. लखनौ विजयासाठी 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण मुंबईला 20 षटकात 6 गडी गमवून 160 धावांपर्यंत मजल मारता आली.
  • तिसऱ्या सामन्यात मुंबईने कमबॅक केलं आणि कोलकाता नाईट रायडर्सला 8 विकेट आणि 43 चेंडू राखून पराभूत केलं. कोलकात्याने 116 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबईने 2 गडी गमवून 12.5 षटकात पूर्ण केलं.
  • चौथ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबईला 12 धावांनी पराभूत केलं. लखनौने 203 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण मुंबई इंडियन्सला 20 षटकात 5 गडी गमवून 191 धावा करता आल्या.
  • पाचव्या सामनयात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबईला 12 धावांनी पराभूत केलं. यावेळी आरसीबीने 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण मुंबईला 20 षटकात 9 गडी गमवून 209 धावा करता आल्या.
  • सहाव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कमबॅक केलं. दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी पराभूत केलं. 20 षटकात 205 धावांचं आव्हान दिलं होते. पण दिल्ली कॅपिटल्सला 193 धावांवर रोखलं.
  • सातव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला 4 विकेट आणि 11 चेंडू राखून पराभूत केलं. हैदराबादने 162 धावांचं आव्हान दिलं होतं. तर मुंबईने हे आव्हान 18.1 षटकात पूर्ण केलं.
  • आठव्या सामन्यात मुंबईने चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचं पाणी पाजलं. या स्पर्धेतील पहिल्या पराभवाचा वचपा काढला. चेन्नईने 176 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबईने 9 विकेट आणि 26 चेंडू राखून पूर्ण केलं.
  • नवव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा समोर होता. या सामन्यात मुंबईने 7 विकेट आणि 26 चेंडू राखून मात दिली. हैदराबादने 143 धावांचं आव्हान दिलं होतं. 16व्या षटकात हे आव्हान पूर्ण केलं.
  • दहाव्या सामन्यात मुंबईने लखनौ सुपर जायंट्सकडून पराभवाची वसुली केली. मुंबईने 215 धावांचं आव्हान दिलं आणि लखनौला 161 धावांवर थांबवलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.