AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: अंगकृष रघुवंशीला तसं वागणं पडलं महागात, सामना मानधनातून 20 टक्के रक्कम कापली

आयपीएल स्पर्धेतील 38व्या सामन्यात विचित्र प्रकार घडला. अंगकृष रघुवंशीला क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याप्रकरणी बाद घोषित केलं. त्यानंतर केकेआर संघ व्यवस्थापनाने नाराजी व्यक्त केली. असं असताना अंगकृष रघुवंशीला मात्र तसं वागणं महागात पडलं आहे.

IPL 2026: अंगकृष रघुवंशीला तसं वागणं पडलं महागात, सामना मानधनातून 20 टक्के रक्कम कापली
IPL 2026: अंगकृष रघुवंशीला तसं वागणं पडलं महागात, सामना मानधनातून 20 टक्के रक्कम कापलीImage Credit source: IPL Twitter
| Updated on: Apr 27, 2026 | 7:26 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. या सामन्यात कोलकात्याने बाजी मारली. पण या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा डाव सुरू असताना धडाधड विकेट पडत होत्या. त्यात अंगकृष रघुवंशीच्या विकेटमुळे चर्चांना उधाण आलं. कारण त्याची विकेट सहज पडली नाही. तर क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याने त्याला बाद घोषित करण्यात आलं. अशा पद्धतीने बाद दिल्याने अंगकृष रघुवंशीचा संताप झाला. त्याने मैदानाबाहेर येताच बॅट आणि हेल्मेट फेकून दिलं. त्याची हीच कृती त्याला महागात पडली. कारण आयपीएस स्पर्धेचं आचारसंहितेचं उल्लंघन मानलं गेलं आहे. त्यासाठी आयपीएल व्यवस्थापनाने त्याला दंड ठोठावला आहे. त्याच्या सामना मानधनातून 20 टक्के रक्कम कापली आहे. तर त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही दिला गेला आहे.

अंगकृष रघुवंशीने आचारसंहितेच्या लेव्हल 1चं उल्लंघन केलं. आयपीएलने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं की, ‘अंगकृष रघुवंशीने कलम 2.2 नियमांचं उल्लंघन केलं आहे. हे सामन्यादरम्यान क्रिकेटचं सामान किंवा कपडे, मैदानातील उपकरणं किंवा फिक्चर आणि फिटिंगचा चुकीचा वापर करण्यासंदर्भात आहे.’ याबाबत पुढे लिहिलं की, ‘ही घटना पाचव्या षटकात झाली जेव्हा क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण केल्याने त्याला बाद घोषित केलं गेलं. त्यानंतर अंगकृष रघुवंशीने रागाने आपली बॅट बाउंड्रीच्या कुशनवर मारली आणि त्यानंतर हेल्मेट डगआऊटमध्ये फेकलं.’

अंगकृष रघुवंशीने आपली चूक मान्य केली आणि सामनाधिकाऱ्यांनी सुनावलेली शिक्षेचा स्वीकार केला आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात अंगकृष रघुवंशी हा 8 चेंडूंमध्ये 9 धावांवर असताना क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याने बाद दिला गेला. आयपीएल 2026 दरम्यान कर्णधारांना वगळून दंड ठोठावण्यात आलेला अंगकृश रघुवंशी हा पाचवा खेळाडू आहे. नितीश राणा, टिम डेव्हिड, अभिषेक शर्मा आणि नांद्रे बर्गर यांनाही दंड ठोठावण्यात आला आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...