LSG vs CSK : चेन्नईची निर्णायक सामन्यात लखनौ विरुद्ध बॅटिंग, यलो आर्मी किती धावा करणार?

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Toss, Ipl 2026 : लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स दोन्ही संघांनी एकाना स्टेडियमधील सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. जाणून घ्या कुणाला संधी मिळालीय.

LSG vs CSK : चेन्नईची निर्णायक सामन्यात लखनौ विरुद्ध बॅटिंग, यलो आर्मी किती धावा करणार?
Ruturaj Gaikwad and Rishab Pant LSG vs CSK
Image Credit source: IPL X Account
| Updated on: May 15, 2026 | 8:20 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील (IPL 2026) 59 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता सुरुवात टॉस झाला. लखनौच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन ऋषभ पंत याने फिल्डिंगचा निर्णय घेत चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. चेन्नईसाठी प्लेऑफच्या हिशोबाने महत्त्वाचा सामना आहे. त्यामुळे यलो आर्मी लखनौ विरुद्ध किमान 200 पार मजल मारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही संघांकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल

चेन्नई आणि लखनौ दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. चेन्नई सुपर किंग्सकडून स्पेन्सर जॉन्सन याचं पदार्पण झालं आहे. तर गुरजनप्रीत सिंह याचा अकील हौसेन याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. मात्र गुरजनप्रीतचा इम्पॅक्ट प्लेअर्सच्या यादीत समावेश आहे. तसेच लखनौच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये अब्दुल समद आणि मुकूल चौधरी या दोघांना संधी देण्यात आली आहे.

पॉइंट्स टेबलमधील दोन्ही संघांची स्थिती

लखनौ सुपर जायंट्स स्पर्धेतून बाहेर झाली आहे. त्यामुळे लखनौचा उर्वरित सामने जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. लखनौ पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी दहाव्या स्थानी आहे. लखनौने 11 पैकी 3 सामने जिंकले आहेत. मात्र आता लखनौ सामना जिंकून चेन्नईच्या अडचणी वाढवू शकते. चेन्नईसाठी प्लेऑफच्या हिशोबाने प्रत्येक सामना हा अटीतटीचा आहे. त्यामुळे चेन्नईलाही इथून एकही पराभव हा प्लेऑफपासून दूर नेणारा ठरु शकतो.

चेन्नईने 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईला 5 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी विराजमान आहे. त्यामुळे आता चेन्नई लखनौला पराभूत करुन प्लेऑफमधील आपला दावा कायम ठेवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हीस, शिवम दुबे, प्रशांत वीर, अंशुल कंबोज, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन आणि मुकेश चौधरी.

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श, निकोलस पूरन, एडन मार्करम, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), मुकुल चौधरी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मोहम्मद शमी, मयंक यादव, आकाश महाराज सिंग आणि प्रिन्स यादव.

Follow Us