IPL 2026, LSG vs GT: गुजरातने लखनौला 7 विकेट्स राखून केलं पराभूत, गिलची सावध खेळी ठरली निर्णायक

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 19व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सला नमवलं आणि दुसऱ्या विजयाची नोंद केली.

IPL 2026, LSG vs GT: गुजरातने लखनौला 7 विकेट्स राखून केलं पराभूत, गिलची सावध खेळी ठरली निर्णायक
IPL 2026, LSG vs GT: गुजरातने लखनौला 7 विकेट्स राखून केलं पराभूत, गिलची सावध खेळी ठरली निर्णायक
Image Credit source: Gujrat Giants Twitter
| Updated on: Apr 12, 2026 | 7:35 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सला 7 गडी राखून पराभूत केलं आहे. यासह स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनौ सुपर जायंट्सचे फलंदाज फार काही चांगली कामगिरी करू शकले नाही. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 8 गडी गमवून 164 धावा केल्या आणि विजयासाठी 165 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गुजरात टायनटन्सने 3 गडी गमवून केलं. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे हा विजय सोपा झाला. त्याला जोस बटलरची साथ मिळाली.

गुजरात टायटन्सचा डाव

आयपीएल स्पर्धेतील लखनौने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना गुजरातने सावध सुरूवात केली. साई सुदर्शन आणि कर्णधार शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीादारी केली. खेळपट्टी फलंदाजीला पूरक नसल्याने शुबमन गिलने तग धरून खेळण्याच निर्णय घेतला. शुबमन गिलने 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.  त्याला जोस बटलरची साथ मिळाली आणि त्याने अर्धशतकी खेळी करत विजयात योगदान दिलं. या दोघांच्या भागीदारीमुळे लखनौ सुपर जायंट्सच्या हातून सामना दूर गेला. शुबमन गिल 40 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 1 षटकार मारला. तर जोस बटलरने 37 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 60 धावा केल्या.

लखनौ सुपर जायंट्सचा डाव

लखनौ सुपर जायंट्सकडून एडन मार्करम वगळता एकही फलंदाज 20 धावा करू शकला नाही. त्यामुळे या सामन्यावर गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची पकड दिसली. लखनौ सुपर जायंट्सला टप्प्याटप्प्याने धक्के बसत गेले. एडन मार्करम आणि मिचेल मार्श ही जोडी सलामीला उतरली होती. मिचेल मार्श 11 धावा करून बाद झाला. कर्णधार ऋषभ पंतही फेल गेला आणि 18 धावा करून तंबूत परतला. एडन मार्करमकडून अपेक्षा होत्या, पण त्याचा खेळही 30 धावांवर आटोपला. आयुष बदोनी 9, निकोलस पूरन 19, अब्दुल समद 18, मुकूल चौधरी 18. जॉर्ज लिंडे 16 धावा करून बाद झाले. तर मोहम्मद शमी नाबाद 12 आणि आवेश खान नाबाद 4 धावांवर होता. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने 4, अशोक शर्माने 2, मोहम्मद सिराजने 1 आणि कागिसो रबाडाने 1 गडी बाद केला.

Follow Us