AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : भुवनेश्वर कुमार Purple Capचा बादशाह, सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर?

IPL 2026 Orange Cap and Purple Cap Holder Match No 39 : आयपीएल 2026 स्पर्धेचा अर्धा हंगाम संपलाय. त्यामुळे आता प्लेऑफच्या हिशोबाने प्रत्येक सामना हा अटीतटीचा होत चालला आहे. त्यामुळे ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठीही चुरस पाहायला मिळत आहे.

IPL 2026 : भुवनेश्वर कुमार Purple Capचा बादशाह, सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर?
Bhuvneshwar Kumar Rcb IPL 2026Image Credit source: PTI
| Updated on: Apr 28, 2026 | 6:00 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 39 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने होते. आरसीबीने दिल्लीच्या होम ग्राउंडमध्ये अर्थात अरुण जेटली स्टेडियममध्ये स्पर्धेच्या इतिहासातील चेंडूबाबत दुसरा सर्वात मोठा विजय मिळवला. आरसीबीने 76 धावांचं आव्हान हे 81 बॉलआधी पूर्ण केलं. आरसीबीने अशाप्रकारे या हंगामातील आपला 6 वा सामना जिंकला. या सामन्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठीही चुरस आणखी वाढली आहे. आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिलं स्थान पटकावलं आहे. भुवीकडे सध्या पर्पल कॅप आहे.

भुवनेश्वर कुमार याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध एकूण 3 विकेट्स मिळवल्या. भुवीने दिल्ली विरुद्ध त्याच्या कोट्यातील 4 पैकी 3 ओव्हर बॉलिंग केली. भुवीने या 3 ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा दिल्या. भुवीने यासह पर्पल कॅप पटकावली. भुवीच्या नावावर 8 सामन्यानंतर 14 विकेट्स आहेत. भुवीने या दरम्यान 7.61 च्या इकॉनमीने धावा दिल्या ज्या सध्याच्या फटकेबाजीच्या तुलनेत फारच कमी आहे.

सारखे विकेट्स तरीही भुवीला पर्पल कॅप कशी?

पर्पल कॅपच्या शर्यतीत अंशुल कंबोज दुसऱ्या स्थानी आहे. अंशुल यानेही 8 सामन्यांत भुवनेश्वरप्रमाणे 14 विकेट्स मिळवल्या आहेत. मात्र भुवीच्या तुलनेत त्याचा इकॉनमी रेट जास्त आहे. त्यामुळे भुवीला पर्पल कॅप देण्यात आली. तर एशान मलिंगा यानेही 8 सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र एशानचा इकॉनमी रेट हा 9.44 असा आहे.

ऑरेंज कॅप कुणाच्या डोक्यावर?

सनरायजर्स हैदराबादचा ओपनर अभिषेक शर्मा याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. अभिषेकने 8 सामन्यांत 380 धावा केल्या आहेत. अभिषेकने या दरम्यान 3 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावलं आहे. अभिषेकनंतर या यादीत दिल्ली कॅपिट्ल्सचा केएल राहुल दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. केएलने एकूण 358 धावा केल्या आहेत. केएलकडे आरसीबी विरुद्ध 23 धावा करुन अभिषेकला पछाडण्याची संधी होती. मात्र केएल 1 धावेवर आऊट झाला. त्यामुळे केएलची संधी हुकली.

विराटचं टॉप 5 मध्ये कमबॅक

राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी तिसऱ्या स्थानी आहे. वैभवने 8 सामन्यांत 357 धावा केल्यात. विराट कोहली याने दिल्ली विरुद्ध नाबाद 23 धावा केल्या. विराटची यासह सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 फलंदाजांमध्ये कमबॅक झालं आहे. विराटच्या नावावर 8 सामन्यांनंतर 351 धावा आहेत. विराट चौथ्या स्थानी आहे. तर हेन्रिक क्लासेन 8 सामन्यानंतर 349 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?