AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs MI: डेब्यूसाठी 8 सामने केली प्रतीक्षा, संधी मिळताच 10 चेंडूत केला सूर्यकुमारचा गेम ओव्हर

आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात युवा वेगवान गोलंदाजाला संधी मिळाली. त्याने या संधीचं सोनं करत महत्त्वाची विकेट मिळवून दिली. कसा राहिला पहिला सामना जाणून घ्या..

CSK vs MI: डेब्यूसाठी 8 सामने केली प्रतीक्षा, संधी मिळताच 10 चेंडूत केला सूर्यकुमारचा गेम ओव्हर
CSK vs MI: डेब्यूसाठी 8 सामने केली प्रतीक्षा, संधी मिळताच 10 चेंडूत केला सूर्यकुमारचा गेम ओव्हरImage Credit source: PTI
| Updated on: May 02, 2026 | 10:06 PM
Share

Rakmakrishna Ghosh Debut: आयपीएल 2026 स्पर्धेत काही खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात काही जणांना खेळता आलं. काही जणांना गरजेनुसार प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलं गेलं. तर अजूनही काही जण पदार्पणासाठी प्रतीक्षा करत आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या वेगवान गोलंदाजाची प्रतीक्षा मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात संपली. वेगवान गोलंदाज रामकृष्ण घोष याला चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली. उंच अंगकाठीचा वेगवान गोलंदाज रामकृष्ण घोषने एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल 2026च्या 44व्या सामन्यात पदार्पण केले. त्याला पहिलं षटक टाकण्यासाठी फार वाट पाहावी लागली नाही. त्याने संधी मिळतात त्याचं सोन केलं. वेगवान गोलंदाज रामकृष्ण घोष याने पहिली विकेट सूर्यकुमार यादवची काढली.

कर्णधार ऋतुराज गायकवाड याने संघाचं नववं षटक रामकृष्ण घोषच्या हाती सोपवलं. हे त्याचं पदार्पणातील पहिलं षटक होतं. पहिल्या षटकात त्याने मुंबई इंडियन्सची धावगती रोखण्यास मदत केली. त्याने या षटकात एक चौकार देत एकूण 7 धावा दिल्या. पहिल्या षटकात प्रभाव पडल्यानंतर ऋतुराज गायकवाडने त्याला पुन्हा एकदा संघाचं 11वं षटक देण्याचा निर्णय घेतला. या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर नमन धीरने त्याला दोन चौकार मारले आणि तिसऱ्या चेंडूवर 1 धाव घेत सूर्यकुमार यादवला स्ट्राईक दिली. चौथ्या चेंडूवर म्हणजे या त्याने टाकलेल्या दहाव्या चेंडूवर सूर्यकुमार यादवची विकेट काढण्यात यश मिळालं. सूर्यकुमार यादवने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण डीप बॅकवर्ड पॉइंटला उभ्या असलेल्या डेवॉल्ड ब्रेविसने सोपा झेल घेतला. सूर्याने 12 चेंडूंमध्ये 21 धावा केल्या.

आयपीएलमध्ये पहिली विकेट घेण्यापूर्वी रामकृष्ण घोषने आपल्या क्षेत्ररक्षणाने लक्ष वेधून घेतलं. त्याने डावाच्या दुसऱ्या षटकात विल जॅक्सनचा अप्रतिम झेल पकडला. हा झेल डीप बॅकवर्ड पॉइंटवर आला होता. घोषने धावत जात पुढे झेप घेतली आणि अप्रतिम झेल पकडला. 28 वर्षीय रामकृष्ण घोषचा आयपीएलचं दुसरं पर्व आहे. गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने त्याला 50 लाख रुपयांना विकत घेतले होते. पण त्याला संपूर्ण हंगामात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

Follow Us
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता... राज ठाकरेंचा मोठा दावा
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद
Pawanraje Nimbalakr Case | पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद केल्या महत्त्वाच्या गोष्टी
परभणीत ATS चा धडाका! 10 ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात!
Parbhani News | परभणीत ATS चा धडाका! 10 ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात!
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी सांगितली 2024 मधील ती गोष्ट
कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा...; राऊतांनी उडवली खिल्ली
Sanjay Raut | कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा वाजवत बसतील; राऊतांनी उडवली खिल्ली
20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल
Omraje Nimbalkar | 20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज मोठा निकाल; ओमराजे मुंबईच्या दिशेने रवाना
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
मोठी बातमी! अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?, फोटोमधून झाला खुलासा
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार