AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs SRH : पराभवाची मालिका रोखण्यासाठी पलटणमध्ये बदल निश्चित, ओपनरचा पत्ता कट! प्लेइंग 11 मध्ये कुणाला संधी?

Mumbai Indians Playing 11 Against Sunrisers Hyderabad : मुंबई इंडियन्स तिसरा विजय मिळवण्यासाठी बुधवारी 29 एप्रिलला बदलांसह उतरणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. जाणून घ्या पलटणची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल.

MI vs SRH : पराभवाची मालिका रोखण्यासाठी पलटणमध्ये बदल निश्चित, ओपनरचा पत्ता कट! प्लेइंग 11 मध्ये कुणाला संधी?
Mumbai Indians Huddle TalkImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 29, 2026 | 7:03 AM
Share

आयपीएल स्पर्धेत एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची 19 व्या मोसमात आतापर्यंत वाईट स्थिती झाली आहे. मुंबईला आतापर्यंत 7 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे आता मुंबईला प्लेऑफच्या शर्यतीत कायम रहायचं असेल तर कोणत्याही स्थितीत उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत. मुंबईसमोर मोहिमेतील आठव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. मुंबई सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरतेय. त्यामुळे वानखेडेत पराभवाची मालिका खंडीत करण्यासाठी पलटण मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल निश्चित समजले जात आहेत. या निमित्ताने मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल हे जाणून घेऊयात.

मुंबईचा स्टार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर आहे. रोहितला हॅमस्ट्रिंगमुळे 3 सामन्यांना मुकावं लागलं आहे. त्यामुळे आता रोहित हैदराबाद विरुद्ध परतल्यास मुंबईसाठी मोठा दिलासा असेल. तसेच रोहित न परतल्यास मुंबईची अडचण कायम राहिल. रोहितच्या अनुपस्थितीत क्विंटन डी कॉक याने आतापर्यंत समाधानकारक कामगिरी आहे. मात्र युवा फलंदाज दानिश मालेवार याला काही खास करता आलेलं नाही. त्यामुळे दानिशला हटवून नमन धीर याचा समावेश करण्यात आला.  मात्र नमन चेन्नई विरुद्ध झिरोवर आऊट झाला. त्यामुळे टीम मॅनेजमेंट नमनवर पुन्हा विश्वास दाखवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

केशव महाराज की विल जॅक्स?

आधीच रोहित नसल्याने मुंबई बॅकफुटवर आहे. त्यात चेन्नई विरूद्धच्या सामन्यात कॅच घेताना बॉलिंग ऑलराउंडर मिचेल सँटनर याला दुखापत झाली. सँटनरला या दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे सँटनरच्या 1 जागेसाठी दोघांमध्ये चुरस असणार आहे. सँटनरच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज याला उर्वरित हंगामासाठी संधी देण्यात आली आहे. मात्र टीम मॅनेजमेंट विल जॅक्स याला संधी देणार की केशवचा समावेश करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डीकॉक (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, विल जॅक्स, जसप्रीत बुमराह, कृष भगत, अल्लाह गजनफर आणि अश्विनी कुमार.

Follow Us
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...