AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : आरसीबीचे खेळाडू आपसात भिडले, 19 व्या मोसमाआधी कोण जिंकलं?

Rcb IPL 2026 Intra Squad Match : आयपीएलच्या 19 व्या मोसमाचं काउंटडाऊन सुरु झालंय. त्याआधी प्रत्येक टीम जोरदार सराव व्हावा यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहेत. या 19 व्या हंगामाआधी आरसीबीच्या खेळाडूंमध्ये सराव सामना खेळवण्यात आला.

IPL 2026 : आरसीबीचे खेळाडू आपसात भिडले, 19 व्या मोसमाआधी कोण जिंकलं?
Rcb Virat Kohli Ipl 2026Image Credit source: @RCBTweets x Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 23, 2026 | 9:39 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. एकूण 10 संघांनी आतापर्यंत जोरदार सराव केला आहे. काही संघातील खेळाडूंना दुखापतीमुळे या संपूर्ण मोसमाला मुकावं लागलं आहे. तर काही खेळाडूंना दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांत खेळता येणार नाही. त्यामुळे संघात त्या त्या खेळाडूंच्या जागी दुसऱ्या क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. अशात आता मुख्य सामन्यांआधी खेळाडूंना जास्तीत जास्त सराव व्हावा या हेतूने आपल्याच संघातील खेळाडूंना 2 गटात विभागून सामने खेळवण्यात येत आहेत.

आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार हा 28 मार्चपासून रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या मोसमात गतविजेता म्हणून उतरणार आहे. आरसीबीसमोर या मोसमात ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. त्याआधी रविवारी 22 मार्च रोजी आरसीबी टीममध्ये एन्ट्रा स्क्वाड मॅच झाली. या सामन्यासाठी आरसीबीच्या खेळाडूंना 2 संघात विभागण्यात आलं.

आरसीबीत 2 संघ आमनेसामने

टीम कृणाल (कृणाल पंड्या) विरुद्ध टीम वेंकी (वेंकटेश अय्यर) यांच्यात हा सामना झाला. विराट कोहली, जितेश शर्मा आणि टीम डेव्हिड आणि इतर खेळाडू हे वेंकटेश अय्यर याच्या टीममध्ये होते. तर कृणालच्या टीममध्ये देवदत्त पडीक्कल, नियमित कर्णधार रजत पाटीदार आणि इतर खेळाडूंचा समावेश होता.

या सराव सामन्यात दोन्ही बाजूने जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. मात्र टीम कृणालने मैदान मारलं. टीम कृणालने हा सामना 13 धावांनी जिंकला. टीम कृणालमधील फलंदाजांनी तडाखेदार बॅटिंग करत 200 पार मजल मारली. टीम कृणालने 4 विकेट्स गमावून 247 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम वेंकीनेही जोरदार प्रतिकार केला. मात्र त्यांचे प्रयत्न अवघ्या काही धावासांठी कमी पडले. टीमी वेंकीने 7 विकेट्स गमावून 234 धावा केल्या.

कुणाच्या किती धावा?

टीम कृणालसाठी या सराव सामन्यात रजत पाटीदर, देवदत्त पडीक्कल आणि कृणाल पंड्या या तिघांनी अर्धशतक झळकावलं. रजतने 74,देवदत्तने 63 आणि कृणालने 58 धावांचं योगदान दिलं.

गतविजेता आरसीबीचा सराव सामना, फलंदाजांची जोरदार बॅटिंग

तर टीम वेंकीसाठी जितेश शर्मा याने चाबूक खेळी केली. जितेशने फक्त 37 बॉलमध्ये 81 रन्स ठोकल्या. ऑलराउंडर टीम डेव्हिड याने 14 बॉलमध्ये 36 रन्स केल्या. तर कॅप्टन वेंकटेश अय्यर याने 16 चेंडूत 30 धावांची खेळी केली. तर रनमशीन विराट कोहली याने 29 धावा जोडल्या.

Follow Us
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर