AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 RR vs GT: गुजरात टायटन्सने राजस्थानला 77 धावांनी केलं पराभूत, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप

आयपीएल 2026 स्पर्धेतील 52 वा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सचं नाणं खणखणीत वाजलं. राजस्थान रॉयल्सला पराभूत करत गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

IPL 2026 RR vs GT: गुजरात टायटन्सने राजस्थानला 77 धावांनी केलं पराभूत, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 09, 2026 | 11:43 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतली 52 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने बाजी मारत राजस्थानला नमवलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण गोलंदाजीत फार काही प्रभाव टाकता आला नाही आणि गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी त्याचा फायदा घेतला. गुजरात टायनटन्सने 20 षटकात 4 गडी गमवून 229 धावा केल्या. तसेच विजयासाठी 230 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरूवात काही चांगली झाली नाही. पावर प्लेमध्ये वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल बाद झाला. त्यामुळे धावगतीला ब्रेक लागला. राजस्थान रॉयल्स 20 षटकात धावा करू शकला. हा सामना गुजरात टायटन्सने 77 धावांनी जिंकला. या विजयासह गुजरात टायटन्सने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. गुजरात टायटन्सने 11 सामन्यात 7 विजयासह 14 गुणांची कमाई केली आहे. आता प्लेऑफच्या दृष्टीने एक विजय दूर आहे. उर्वरित तीन पैकी एका सामन्यात विजय मिळवलं की झालं.

गुजरात टायटन्सचा डाव

गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चांगली सुरूवात केली. पहिल्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी केली. साई सुदर्शन 36 चेंडूत 55 धावा करून बाद झाला. तर शुबमन गिलने 44 चेंडूत 84 धावांची खेळी केली. जोस बटलरने 10 चेंडूत 13, जेसन होल्डरने 7 चेंडूत 7 धावा करून बाद झाले. तकर वॉशिंग्टन सुंदर 20 चेंडूत 37 धावा करून नाबाद राहिला. तर राहुल तेवतियाने 4 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 14 धावांची खेळी केली. राजस्थानकडून ब्रिजेश शर्माने 2, तर यश राज पुनिया आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

राजस्थान रॉयल्सचा डाव

गुजरात टायटन्सने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरूवात काही चांगली झाली नाही. यशस्वी जयस्वाल 3 धावा करून बाद झाला. वैभव सूर्यवंशीने आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 16 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकार मारत 36 धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर आलेला शिमरोन हेटमायरही काही खास करू शकला नाही. त्याने 7 चेंडूत 6 धावा केल्या आणि तंबूत परतला. ध्रुव जुरेल 24 धावा, डोनोवन फरेरा 4 धवा, शुभम दुबे 15 धावांवर बाद झाले. रवींद्र जडेजाची खेळीही फार लांब चालली नाही आणि 38 धावांवर खेळ आटोपला. जोफ्रा आर्चर 5, दासुन शनाका 16 आणि तुषार देशपांडे 1 धाव करून बाद झाला.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी