AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Auction 2022: शार्दूल ठाकूरला दहा कोटींना विकत घेतलं तर त्या मालकाला किती फायदा होतो? समजून घ्या आयपीएलचं बिझनेस मॉडेल?

IPL Auction 2022: खेळाडूंवर जेव्हा हे फ्रेंचायजी इतकी मोठी रक्कम खर्च करतात, तेव्हा त्यांना फायदा कसा मिळतो?

IPL Auction 2022: शार्दूल ठाकूरला दहा कोटींना विकत घेतलं तर त्या मालकाला किती फायदा होतो? समजून घ्या आयपीएलचं बिझनेस मॉडेल?
आयपीएलच्या मेगा ऑक्शनची (IPL Mega Auction) जवळपास तयारी पूर्ण झाली आहे. सगळ्याच संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडुंची यादी जारी केली आहे. लीगमध्ये सहभागी झालेल्या दोन नव्या संघांनीही आपल्या निवडलेल्या खेळाडुंची यादी जारी केली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक मोठी नावं ऑक्शनमध्ये दिसणार नाहीत.
| Edited By: | Updated on: Feb 13, 2022 | 1:55 AM
Share

बंगळुरु: TATA IPL 2022 Mega Auction चा काल पहिला दिवस पार पडला. दहा आयपीएल फ्रेंचायजींनी वेगवेगळ्या खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावली. काही खेळाडूंवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूंनाही 9 ते 10 कोटी रुपयापर्यंत रक्कम मिळाली. खेळाडूंवर जेव्हा हे फ्रेंचायजी इतकी मोठी रक्कम खर्च करतात, तेव्हा त्यांना फायदा कसा मिळतो? आयपीएलच्या लिलावात हे फ्रेंचायची नेहमी आपल्याला कोट्यवधी रुपयांची बोली लावताना दिसतात. इतका पैसा ते खर्च करतात, मग त्यातून ते स्वत:चा नफा कसा कमावतात? हा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी आपल्याला IPL चं बिझनेस मॉडेल समजून घ्यावं लागेल. IPL चं बिझनेस मॉडेलचं असं बनवलेल आहे की, त्यातून फ्रेंचायजी आणि BCCI दोघांना घसघशीत फायदा होतो. मागच्यावर्षी आयपीएलचं पहिलं सत्र भारतात झालं किंवा यंदाच्या आयपीएलमध्येही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नसेल. त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडेल की, तिकिट विक्री होणार नसेल, तर मग आयपीएलच्या संघ मालकांना फायदा कसा होईल? मूळातच आयपीएलची रचना अशी आहे की, फ्रेंचायजी पूर्णपणे उत्पनासाठी तिकिट विक्रीवर अवलंबून नाहीयत.

IPL चं बिझनेस मॉडेल काय आहे?

मूळातच आयपीएलचं बिझनेस मॉडेल खूप मजबूत आहे. त्यामुळे ते कोविड सारख्या संकटातही तग धरु शकलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेची रचनाच व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे. IPL स्पर्धेद्वारे कंपन्यांना त्यांच्या बिझनेसचं मार्केटिंग आणि जाहीरात करण्याची संधी मिळते.

BCCI आणि IPL कसा पैसा कमावतात?

आयपीएल बिझनेस मॉडेलच्या रचनेनुसार खासगी कंपन्यांना फ्रेंचायजी विकत घेण्यासाठी निमंत्रित केले जाते. एका मोठ्या किंमतीला फ्रेंचायजीचे हक्क विकल्यानंतर अन्य कंपन्यांना स्पर्धेतील गुंतवणुकीमध्ये आपला फायदा दिसतो. तिथूनच पैसा यायला सुरुवात होते. स्पर्धेची टायटल स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी काही बड्या उद्योगसमूहांमध्ये चुरस असते. पुढच्या तीन वर्षांसाठी टाटा समूहाकडे टायटल स्पॉन्सरशिप आहे.

आयपीएल म्हणजे फक्त एक क्रीडा स्पर्धा नाहीय ते एक मनोरंजनही आहे. मनोरंजन उद्योग कधीही उतरणीला लागणार नाही, हा गुंतवणूकदाराला विश्वास असतो. भारतात क्रिकेट म्हणजे एक धर्मच आहे. टीव्ही समोर सामना पाहणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. आयपीएलमध्ये बॉलिवूड आणि क्रिकेट दोघांचा संगम आहे. कोट्यवधील लोकांचे यातून मनोरंजन होते.

मीडिया राइटस म्हणजे प्रसारण हक्क विक्रीतून BCCI ला घसघशीत उत्पन्न मिळते. आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क विकत घेणारी वाहिनी आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मकडून बीसीसीआयला मोठी रक्कत मिळते. यंदा प्रसारण हक्क विक्रीतून बीसीसीआयला 40 ते 45 हजार कोटी रुपये मिळू शकतात. त्यामुळे हे फ्रेंचायजी खेळाडूंवर 10-15 कोटींची सहज बोली लावू शकतात. बीसीसीआयने त्यातून आपला वाटा काढल्यानंतर उर्वरित रक्कम फ्रेंचायजींमध्ये वितरीत केली जाते. गुणतालिकेत जो संघ अव्वल असतो, त्यांना सर्वात जास्त रक्कम मिळते. मीडिया राईटसमधून आयपीएलच्या संघ मालकांना 60-70 टक्के महसूल मिळतो.

आयपीएल संघ कसे कमाई करतात?

ब्रँड स्पॉन्सरशिपमधून प्रत्येक आयपीएल संघ सर्वाधिक कमाई करतो. फ्रेंचायजी ब्रँड सोबत पार्टनरशिप करतात. त्या ब्रँडचा लोगो किटवर दिसेल, त्यातून जाहीरात होईल याची हमी फ्रेंचायजींकडून दिली जाते. त्या बदल्यात ब्रँडकडून फ्रेंचायजींना पैसा दिला जातो. स्पॉन्सरशिपमधून आयपीएल संघ 20 ते 30 टक्के कमाई करतात.

तिकिट विक्रीतून किती पैसे मिळतात?

त्याशिवाय तिकिट विक्रीतून आयपीएल फ्रेंचायजींना पैसा मिळतो. संघ मालक तिकिटाची किंमत ठरवतात. बीसीसीआयला त्यातूनही वाटा मिळतो. तिकिट विक्रीतून आयपीएल टीम्सना दहा टक्के महसूल मिळतो.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.