AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Auction 2024 : IPL लिलावाची तारीख आणि ठिकाण ठरलं, आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!

IPL 2024 Auction Date and Venue : आयपीएल 2024 च्या लिलावाची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. आयपीएल लिलावाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच लिलाव हा परदेशात होणार आहे. कधी आणि कुठे जाणून घ्या.

IPL Auction 2024 : IPL लिलावाची तारीख आणि ठिकाण ठरलं, आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
| Updated on: Dec 03, 2023 | 1:44 PM
Share

मुंबई : आयपीएल 2024 सीझनआधी लिलावाची तारीख आणि ठिकाणाची अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. आयपीएलच्या लिलावाआधी ट्रेडिंग विन्डोमध्ये अनेक खेळाडूंची अदला-बदल झालेली पाहायला मिळते. आयपीएच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाचा लिलावाचं आयोजन हे परदेशात करण्यात आलं आहे. या लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी नाव दिली आहेत यामधील 77 खेळाडूंवर फ्रँचायझी 262.95 कोटी लावणार आहे. हा लिलाव कुठे आणि कधी होणार जाणून घ्या.

या ठिकाणी पार पडणार  लिलाव?

19 डिसेंबरला हा लिलाव दुबईमध्ये होणार आहे. हा मिनी लिलाव असल्यामुळे एक दिवसात पडला जाणार आहे. यंदाच्या लिलावामध्ये  मोठे खेळाडू आहेत ज्यांना कोणते संघ घेण्यात यशस्वी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यंदाच्या लिलावामध्ये 61  खेळाडूंनी आपली बेस प्राईज ही करोडोंमध्ये ठेवली आहे.  यामधील 25 खेळाडूंनी आपली बेस प्राईज ही 2 कोटी ठेवली आहे. दक्षिण आफ्रिकेचा नवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी आणि धोकादायक फलंदाज रॅसी व्हॅन डर डुसेन यांचाही 2 कोटी रुपयांचा समावेश आहे. जगातील अव्वल फिरकीपटूंपैकी एक वानिंदू हसरंगा 1.5 कोटी आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सोडले आहे.

2 कोटी बेस प्राईज असलेले खेळाडू :

हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केदार जाधव, मुजीब उर रहमान, शॉन अॅबॉट, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, मुस्तफिजुर रहमान, टॉम बॅंटन, हॅरी ब्रूक. , बेन डकेट, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, लॉकी फर्ग्युसन, जेराल्ड कोएत्झी, रिले रॉसौ, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, अँजेलो मॅथ्यूज

1.5 कोटी बेस प्राईज असलेले खेळाडू :

मोहम्मद नबी, मॉइसेस हेन्रिक्स, ख्रिस लिन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, डॅनियल वॉरॉल, टॉम करन, मर्चंट डी लँग, ख्रिस जॉर्डन, डेविड मलान, टायमल मिल्स, फिल सॉल्ट, कोरी अँडरसन, कॉलिन मुनरो, जिमी नीशम , टिम साउथी, कॉलिन इंग्राम, वानिंदू हसरंगा, जेसन होल्डर, शेरफेन रदरफोर्ड

1 कोटी बेस प्राईज असलेले खेळाडू :

ऍश्टन अगर, रिले मेरेडिथ, डी’आर्सी शॉर्ट, ऍश्‍टन टर्नर, गस ऍटकिन्सन, सॅम बिलिंग्ज, मायकेल ब्रेसवेल, मार्टिन गुप्टिल, काइल जेमिसन, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, अल्झारी जोसेफ, रोव्हमन. पॉवेल, डेव्हिड विसे

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.