IPL 2022: फक्त मुंबई-पुण्यात नव्हे, नरेंद्र मोदी स्टेडियममध्येही होणार IPL चे सामने

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: दीनानाथ मधुकर परब, Tv9 मराठी

Updated on: Jan 31, 2022 | 10:55 AM

मुंबई: मागच्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही IPL स्पर्धेवर कोरोनाचे सावट आहे. IPL स्पर्धेचा 2020 चा पूर्ण मोसम यूएईमध्ये झाला, तर 2021 चा उतरार्ध UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता. 2021 मध्ये स्पर्धेची सुरुवात भारतामध्ये झाली होती. पण अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढली त्यामुळे दुसरा मोसम स्थगित करुन उतरार्ध यूएईमध्ये खेळवण्यात आला. यंदाचा आयपीएलचा सीजन भारतातच खेळवण्याचा […]

IPL 2022: फक्त मुंबई-पुण्यात नव्हे, नरेंद्र मोदी स्टेडियममध्येही होणार IPL चे सामने

मुंबई: मागच्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही IPL स्पर्धेवर कोरोनाचे सावट आहे. IPL स्पर्धेचा 2020 चा पूर्ण मोसम यूएईमध्ये झाला, तर 2021 चा उतरार्ध UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता. 2021 मध्ये स्पर्धेची सुरुवात भारतामध्ये झाली होती. पण अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढली त्यामुळे दुसरा मोसम स्थगित करुन उतरार्ध यूएईमध्ये खेळवण्यात आला. यंदाचा आयपीएलचा सीजन भारतातच खेळवण्याचा BCCI चा प्रयत्न आहे. आम्ही भारतातच आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा पूर्ण प्रयत्न करु, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं आहे. आयपीएल हा 15 वा सीजन असून आधी संपूर्ण स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित करण्याचा बीसीसीआयचा विचार होता. त्यासाठी राजकीय भेटीगाठी सुद्धा झाल्या होत्या. पण आता महाराष्ट्राच्या बरोबरीने गुजरातमध्येही आयपीएल सामने आयोजित करण्याचा विचार सुरु असल्याची माहिती आहे.

ठरलं! यंदाच IPL भारतातच
आयपीएलमधील लीग स्टेज म्हणजे साखळी फेरीचे सामने महाराष्ट्रात आणि प्लेऑफचे चार संघांमधील सामने गुजरातमध्ये आयोजित करण्यावर BCCI विचार करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. गुरुवारी पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर बीसीसीआयने भारतातच IPL सामने आयोजित करण्याचा अंतिम निर्णय घेतल्याची माहिती आहे. महाराष्ट्र आणि देशातील परिस्थिती कोविडमुळे बिघडली, तरच UAE मध्ये उर्वरित स्पर्धा खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.

मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन ठिकाणी आयपीएलचे साखळी फेरीतील सर्व सामने खेळवण्याची बीसीसीआयची योजना आहे. मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियम आणि पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या गहुजे स्टेडियमवर आयपीएल सामने खेळवले जाऊ शकतात. प्लेऑफचे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होऊ शकतात.

मुंबई-पुण्याला पहिली पसंती का?
प्रवासामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे. त्यातुलनेत मुंबई-पुण्यात चांगल्या सोयी-सुविधा युक्त चार स्टेडियम उपलब्ध आहेत. त्यामुळे खेळाडूंसह सर्वांचीच सुरक्षा लक्षात घेऊन मुंबई-पुण्याचा पर्याय व्यवहार्य आहे. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनाला मुंबई-पुण्याला पहिली पसंती आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आगामी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे सीरीजमधले एकदिवसीय सामने होणार आहेत.

IPL in India Maharashtra likely to hold the league matches Gujarat the playoffs

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI