AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs GT IPL 2022 Match Result: अरेरे, रसेलचे 6 Six फुकट गेले, स्पेशल Highlights चा एकही VIDEO नका चुकवू

KKR vs GT IPL 2022 Match Result: केकेआरला निर्धारीत 20 षटकात आठ बाद 148 धावाच करता आल्या. गुजरातने विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य दिले होते.

KKR vs GT IPL 2022 Match Result: अरेरे, रसेलचे 6 Six फुकट गेले, स्पेशल Highlights चा एकही VIDEO नका चुकवू
केकेआर आंद्रे रसेल Image Credit source: BCCI
| Updated on: Apr 23, 2022 | 8:06 PM
Share

मुंबई: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (KKR vs GT) हा प्रेक्षकांना आज एक रोमांचक सामना अनुभवता आला. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना उत्कंठावर्धक ठरला. आंद्रे रसेलने (Andre Russell) त्याला मिळालेल्या एका जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलत केकेआरचं आव्हान शेवटपर्यंत जिवंत ठेवलं. यश दयाल 13 व षटक टाकत होता. त्यावेळीच रसेल झेलबाद झाला होता. पण पंचानी तो चेंडू नो बॉल ठरवला. रसेल सारख्या फलंदाजाला एक जीवदानही पुरेस असतं. तिथून त्याने कोलकात्याच्या बाजूने सामना फिरवला. अगदी अखरेच्या षटकापर्यंत रसेल सामना जिंकवून देईल, असं वाटत होतं. अलझारी जोसेफच्या (Alzarri Joseph) पहिल्या चेंडूवर त्याने षटकार मारला. पण दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळताना तो फर्ग्युसनकरवी झेलबाद झाला. त्यानंतर उमेश यादवला अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. आंद्रे रसेलने आज 25 चेंडूत 48 धावा केल्या. यात एक चौकार आणि सहा षटकार होते.

गुजरात टायटन्स टॉपवर

केकेआरला निर्धारीत 20 षटकात आठ बाद 148 धावाच करता आल्या. गुजरातने विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य दिले होते. या विजयासह गुजरात टायटन्सचा संघ पॉइंटस टेबलमध्ये टॉपवर पोहोचला आहे. गुजरातने आतापर्यंत सात पैकी सहा सामने जिंकले असून ते पहिल्या स्थानावर आहेत. दुसऱ्या बाजूला केकेआरचा संघ सातव्या स्थानावर आहे. त्यांनी पाच सामने गमावले असून तीनच विजय मिळवले आहेत.

इथे क्लिक करुन पहा आंद्रे रसेलची स्पेशल इनिंग

लॉकी फर्ग्युसनची गेम चेंजिंग कॅच पहाण्यासाठी इथे क्लिक करा

हार्दिक पंड्याची कॅप्टन इनिंग्स

गुजरातकडून आज हार्दिक पंड्या पुन्हा एकदा कॅप्टन इनिंग्स खेळला. त्याने 49 चेंडूत 67 धावा केल्या. यात चार षटकार आणि दोन चौकार होते. हार्दिक पंड्यालाही एक जीवदान मिळालं. त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. हार्दिकने या सामन्यात कॅप्टन इनिंग्स खेळला. त्याने यंदाच्या सीजनमध्ये तिसरं अर्धशतक झळकावलं. त्याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली.

इथे क्लिक करुन पहा अभिनव मनोहरने बाउंड्रीवर घेतलेला वेंकटेश अय्यरचा सुपर्ब कॅच

एक ओव्हरमध्ये चार विकेट क्लिक करुन पहा आंद्रे रसेली ती मॅजिक ओव्हर

आंद्रे रसेलची एक ओव्हर चार विकेट

आंद्रे रसेलने आज फलंदाजी बरोबर गोलंदाजीतही जलवा दाखवला. त्याने एक ओव्हर टाकली. पण त्याने या एक ओव्हरमध्ये पाच धावा देऊन चार विकेट काढल्या. अभिनव मनोहर, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि राहुल तेवतिया या चार महत्त्वाच्या विकेट त्याने एकाच ओव्हरमध्ये काढल्या.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.