PBKS vs GT IPL Match Result: राहुल तेवतियाचे शेवटच्या दोन चेंडूंवर दोन SIX, गुजरात टायटन्सची विजयाची हॅट्ट्रिक

PBKS vs GT IPL Match Result: क्रिकेट रसिकांना आज आयपीएलमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सवर (GT vs PBKS) शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला.

PBKS vs GT IPL Match Result: राहुल तेवतियाचे शेवटच्या दोन चेंडूंवर दोन SIX, गुजरात टायटन्सची विजयाची हॅट्ट्रिक
गुजरात टायटन्स राहुल तेवतिया Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 12:08 AM

मुंबई: क्रिकेट रसिकांना आज आयपीएलमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सवर (GT vs PBKS) शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. सलामीवीर शुभमन गिलने (Shubhaman Gill) 59 चेंडूत 96 धावांची खेळी करुन विजयाचा पाया रचला, तर राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) त्यावर कळस चढवण्याचं काम केलं. शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सला विजयासाठी सहा चेंडूत 19 धावांची गरज होती. पंजाब किंग्सचा ओडियन स्मिथ षटक टाकत होता. स्मिथने पहिला चेंडू वाईड टाकला. विजयासाठी सहा चेंडूत 18 धावा हव्या होत्या. त्यावेळी डेविड मिलरने धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यात चांगली फलंदाजी करणारा हार्दिक पंड्या रनआऊट झाला. अखेरच्या दोन चेंडूत विजयासाठी 12 धावांची गरज होती. राहुल तेवितया स्ट्राइकवर होता. त्याने दोन चेंडूत दोन षटकार ठोकून गुजरातला रोमांचक विजय मिळवून दिला.

पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना नऊ बाद 189 धावा केल्या. गुजरातला विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य मिळाले. ते त्यांनी शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. आयपीएलमध्ये डेब्यू करणाऱ्या गुजरातने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.

शुभमन गिलने रचला पाया

पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना नऊ बाद 189 धावा केल्या. गुजरातला विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य मिळाले. ते त्यांनी शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. आयपीएलमध्ये डेब्यू करणाऱ्या गुजरातने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. तत्पूर्वी गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलने विजयाचा पाया रचला. त्याने 59 चेंडूत 96 धावांची खेळी केली. यात 11 चौकार आणि एक षटकार होता. शुभमन गिलने 190 सारख्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने दुसऱ्या विकेटसाठी साई सुदर्शन बरोबर 101 धावांची भागीदारी केली.

मिलरच्या चुकीमुळे हार्दिक रनआऊट

साई सुदर्शनने 35 धावा केल्या. साई सुदर्शन बाद झाल्यानंतर धावगती वाढवण्याची गरज होती. त्यावेळी कॅप्टन हार्दिक पंड्या मैदानात आला. त्याने 18 चेंडूत 27 धावांची खेळी केली. यात पाच चौकार होते. मोक्याच्या क्षणी डेविड मिलरच्या चुकीमुळे तो धावबाद झाला. अखेरीस राहुल तेवतियाने दोन षटकार ठोकून गुजरातला रोमांचक विजय मिळवून दिला.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.