Punjab kings vs Gujarat Titans Live Score, IPL 2022: शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून गुजरात टायटन्स विजयी

| Updated on: Apr 09, 2022 | 12:09 AM

punjab kings vs gujarat titans live score in marathi: गुजरात टायटन्सची गोलंदाजी विरुद्ध पंजाब किंग्सची मजबूत फलंदाजी असं या सामन्याचं स्वरुप आहे.

Punjab kings vs Gujarat Titans Live Score, IPL 2022: शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून गुजरात टायटन्स विजयी
पंजाब किंग्स वि गुजरात टायटन्स

PBKS vs GT, IPL 2022: क्रिकेट रसिकांना आज आयपीएलमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सवर (GT vs PBKS) शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. सलामीवीर शुभमन गिलने (Shubhaman Gill) 59 चेंडूत 96 धावांची खेळी करुन विजयाचा पाया रचला, तर राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) त्यावर कळस चढवण्याचं काम केलं. शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सला विजयासाठी सहा चेंडूत 19 धावांची गरज होती. पंजाब किंग्सचा ओडियन स्मिथ षटक टाकत होता. स्मिथने पहिला चेंडू वाईड टाकला. विजयासाठी सहा चेंडूत 18 धावा हव्या होत्या. त्यावेळी डेविड मिलरने धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यात चांगली फलंदाजी करणारा हार्दिक पंड्या रनआऊट झाला. अखेरच्या दोन चेंडूत विजयासाठी 12 धावांची गरज होती. राहुल तेवितया स्ट्राइकवर होता. त्याने दोन चेंडूत दोन षटकार ठोकून गुजरातला रोमांचक विजय मिळवून दिला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 08 Apr 2022 11:31 PM (IST)

    शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून गुजरात टायटन्स विजयी

    दोन चेंडूत 12 धावांची गरज असताना राहुल तेवतियाने दोन षटकार ठोकून गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला आहे. पंजाबने विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य दिलं होतं. हे आव्हान गुजरात टायटन्सने पार केलं आहे.

  • 08 Apr 2022 11:25 PM (IST)

    मोक्याच्या क्षणी हार्दिक पंड्या रनआऊट

    गुजरातला विजयासाठी 5 चेंडूत 18 धावांची गरज आहे. शुभमन गिल 96 धावांवर आऊट झाला. हार्दिक पंड्या मोक्याच्याक्षणी 27 धावांवर रनआऊट झाला.

  • 08 Apr 2022 11:22 PM (IST)

    गुजरातला विजयासाठी 6 चेंडूत 19 धावांची गरज

    गुजरातला विजयासाठी 6 चेंडूत 19 धावांची गरज आहे. शुभमन गिल 96 धावांवर आऊट झाला.

  • 08 Apr 2022 11:14 PM (IST)

    दोन ओव्हर्समध्ये 32 धावांची गरज

    गुजरात टायटन्सच्या 18 षटकात दोन बाद 158 धावा झाल्या आहेत.

  • 08 Apr 2022 11:09 PM (IST)

    18 चेंडूत विजयासाठी 38 धावांची गरज

    गुजरातला 18 चेंडूत विजयासाठी 38 धावांची गरज आहे. शुभमन गिल 92 आणि हार्दिक पंड्या 15 धावांवर खेळतोय.

  • 08 Apr 2022 11:05 PM (IST)

    शुभमन गिल-हार्दिक पंड्या मैदानात

    16 ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सच्या दोन बाद 140 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 90 आणि हार्दिक पंड्या 6 धावांवर खेळतोय.

  • 08 Apr 2022 10:48 PM (IST)

    सलग दुसऱ्या सामन्यात शुभमन गिलची जबरदस्त फलंदाजी

    सलग दुसऱ्या सामन्यात शुभमन गिलची जबरदस्त फलंदाजी सुरु आहे. गुजरात टायटन्सच्या तेरा षटकात एक बाद 119 धावा झाल्या आहेत. गिल 80 धावांवर खेळतोय.

  • 08 Apr 2022 10:42 PM (IST)

    गुजरात टायटन्सच्या एक बाद 110 धावा

    12 षटकात गुजरात टायटन्सच्या एक बाद 110 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 73 धावांवर आणि साई सुदर्शन 28 धावांवर खेळतोय.

  • 08 Apr 2022 10:25 PM (IST)

    शुभमन गिलची सलग दुसरी हाफ सेंच्युरी

    शुभमन गिलने सलग दुसरी हाफ सेंच्युरी झळकवली आहे. गुजरात टायटन्सच्या नऊ षटकात एक बाद 88 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 32 चेंडूत 58 आणि साई सुदर्शन 22 धावांवर खेळतोय.

  • 08 Apr 2022 10:18 PM (IST)

    आठ षटकात गुजरात टायटन्सच्या एक बाद 76 धावा

    आठ षटकात गुजरात टायटन्सच्या एक बाद 76 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 47 आणि साई सुदर्शन 20 धावांवर खेळतोय.

  • 08 Apr 2022 10:16 PM (IST)

    शुभमन गिलचा षटकार

    ओडियन स्मिथच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने मिडविकेटला षटकार ठोकला. 25 चेंडूत तो 45 धावांवर खेळतोय.

  • 08 Apr 2022 10:11 PM (IST)

    शुभमन गिलची चांगली फलंदाजी

    शुभमन गिल चांगली फलंदाजी करतोय. पावरप्लेमध्ये गुजरात टायटन्सच्या एक बाद 53 धावा झाल्या आहेत. रबाडाच्या गोलंदाजीवर सलामीवीर मॅथ्यू वेडने सहा धावांवर बेअरस्टोकडे झेल दिला. शुभमन गिल 33 आणि साई सुदर्शन 19 धावांवर खेळतोय.

  • 08 Apr 2022 09:29 PM (IST)

    शेवटच्या जोडीची कमाल

    राहुल चाहर आणि अर्शदीप सिंह मध्ये शेवटच्या विकेटसाठी 27 धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. गुजरात टायटन्सने सामन्यावर पकड बनवण्याची संधी गमावली. राहुल चाहरने नाबाद 22 आणि अर्शदीप सिंहने नाबाद 10 धावा केल्या. पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • 08 Apr 2022 09:06 PM (IST)

    गुजरात टायटन्सचं कमबॅक, पंजाब किंग्सच्या आठ विकेट

    पंजाब किंग्सचा डाव अडचणीत सापडला आहे. त्यांच्या आठ विकेट गेल्या आहेत. कागिसो रबाडा एक रन्सवर रनआऊट झाला.

  • 08 Apr 2022 09:02 PM (IST)

    लिविंगस्टोन पाठोपाठ शाहरुख खान आऊट

    लिविंगस्टोन पाठोपाठ शाहरुख खान आऊट झाला आहे. राशिद खानने त्याला पायचीत पकडलं. शाहरुखने आठ चेंडूत 15 धावा केल्या. यात दोन षटकार होते. राशिद खानने 16 व्या षटकात दोन विकेट काढल्या.

  • 08 Apr 2022 08:59 PM (IST)

    धमाकेदार फलंदाजी करणारा लिविंगस्टोन अखेर OUT

    धमाकेदार फलंदाजी करणारा लिविंगस्टोन अखेर OUT झाला आहे. राशिद खानने त्याला मिलरकरवी झेलबाद केलं. लिविंगस्टोनने 27 चेंडूत 64 धावा केल्या. त्यान सात चौकार आणि चार षटकार ठोकले. पंजाब किंग्सच्या सहा बाद 154 धावा झाल्या आहेत.

  • 08 Apr 2022 08:56 PM (IST)

    लिविंगस्टोन-शाहरुख खानची धमाकेदार फलंदाजी

    लियाम लिविंगस्टोन आणि शाहरुख खानची धमाकेदार फलंदाजी सुरु आहे. 15 षटकात पंजाबच्या पाच बाद 152 धावा झाल्या आहेत.

  • 08 Apr 2022 08:46 PM (IST)

    दर्शन नालकंडेची जबरदस्त गोलंदाजी

    दर्शन नालकंडेने लागोपाठच्या चेंडूंवर जितेश शर्मा आणि ओडियन स्मिथची विकेट काढली. जितेश शर्माने 23 धावा केल्या. स्मिथ भोपळाही न फोडता तंबूत परतला.

  • 08 Apr 2022 08:41 PM (IST)

    राहुल तेवतियाचं महागडं षटक

    गुजरात टायटन्सच्या राहुल तेवितयाचं 13 व षटक महागडं ठरलं आहे. या ओव्हरमध्ये जितेश शर्मा आणि लिविंगस्टोनने धावा लुटल्या. त्यांनी एका ओव्हरमध्ये 24 धावा वसूल केल्या. लिविंगस्टोनने सिक्स मारुन अर्धशतक पूर्ण केलं.

  • 08 Apr 2022 08:27 PM (IST)

    शिखर धवन बाद

    मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही लियाम लिविंगस्टोन धमाकेदार फलंदाजी करत आहे. त्याने आतापर्यंत 14 चेंडूत 36 धावा केल्या आहेत. यात तीन चौकार आणि तीन षटकार आहेत. दरम्यान शिखर धवन 35 धावांवर आऊट झाला आहे. राशिद खानने विकेट काढली. पंजाब किंग्सच्या तीन बाद 86 धावा झाल्या आहेत.

  • 08 Apr 2022 08:03 PM (IST)

    पावरप्लेची सहा षटकं पूर्ण

    पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकात PBKS च्या दोन बाद 43 धावा झाल्या आहेत. शिखर धवन 24 आणि लियाम लिविंगस्टोन 5 धावांवर खेळतोय.

  • 08 Apr 2022 07:58 PM (IST)

    PBKS ला दुसरा झटका

    पंजाब किंग्सला दुसरा झटका बसला आहे. लॉकी फर्ग्युसनने जॉनी बेअरस्टोला आठ धावांवर आऊट केलं. पंजाब किंग्सच्या पाच षटकात दोन बाद 38 धावा झाल्या आहेत.

  • 08 Apr 2022 07:41 PM (IST)

    PBKS ला पहिला झटका, हार्दिकने मिळवून दिलं यश

    PBKS ला पहिला झटका बसला आहे. हार्दिकने यश मिळवून दिलं आहे. कॅप्टन मयंक अग्रवालला हार्दिकने राशिद खानकरवी पाच धावांवर झेलबाद केलं. पंजाबच्या दोन षटकात एक बाद 12 धावा झाल्या आहेत.

  • 08 Apr 2022 07:35 PM (IST)

    मोहम्मद शमीने टाकलं पहिलं षटक

    मोहम्मद शमीने पहिलं षटक टाकलं. पंजाब किंग्सच्या बिनबाद 5 धावा झाल्या आहेत. मयंक अग्रवाल आणि शिखर धवनची जोडी मैदानात आहे.

  • 08 Apr 2022 07:30 PM (IST)

    अशी आहे पंजाब किंग्सची Playing - 11

  • 08 Apr 2022 07:29 PM (IST)

    अशी आहे गुजरात टायटन्सची Playing - 11

Published On - Apr 08,2022 7:28 PM

Follow us
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.