IPL 2023 Points Table | यंदाच्या पर्वात प्ले-ऑफमध्ये गुजरात टायटन्स फिक्स, आता मुंबई इंडिअन्ससाठी मोठी संधी

IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : मुंबई इंडिअन्सचं नशीब उचकटलं, आता पॉइंट टेबलला दुसऱ्या स्थानी जाण्याची संधी, नेमकं कसं असणार समीकरण जाणून घ्या.

IPL 2023 Points Table | यंदाच्या पर्वात प्ले-ऑफमध्ये गुजरात टायटन्स फिक्स, आता मुंबई इंडिअन्ससाठी मोठी संधी
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 12:54 AM

मुंबई : गुजरात टायटन्स संघाने सनराईजर्स हैदराबाद संघावर विजय मिळवत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. या विजयासह आता गुजरातने आपली जागा फिक्स केलीच. तर आता आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडिअन्स संघासाठीही मोठी संधी आहे. गुजरातने विजय मिळवल्यावर मुंबईला नेमकी कशी काय संधी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या नेमकं कसं असणार आहे समीकरण.

संघमॅचविजय पराभवगुणएनआरआर
गुजरात टायटन्स1410420+0.820
चेन्नई सुपर किंग्स148517+0.652
लखनऊ सुपर जायंट्स 148517+0.284
मुंबई इंडियन्स 148616-0.044
राजस्थान रॉयल्स147714+0.148
आरसीबी 137614-0.128
केकेआर146812-0.229
पंजाब किंग्स146812-0.304
दिल्ली कॅपिटल्स145910-0.808
सनरायजर्स हैदराबाद 134908-0.558

गुजरात टायटन्सने पॉइंट टेबलमध्ये आपलं पहिलं स्थान पक्कं केलं आहे. पॉइंट टेबलवर नजर मारलीत तुमच्या लक्षात येईल की सीएसकेचे 18 गुण काही होणार नाहीत. मुंबईने राहिलेल्या सामन्यात विजय मिळवला तर मुंबईला दुसऱ्या स्थानी जाण्याची संधी आहे. मुंबईचा मंगळवारी सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि शेवटचा हैदराबादसोबत आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये पलटणला विजय मिळवावा लागणार आहे. सीएसकेचा आता दिल्लीसोबत सामना असून त्यांनी विजय मिळवला तरी 17 गुण होणार आहेत.

आजच्या सामन्याचा धावता आढावा

गुजरात संघाची सुरूवात खराब झाली होती. भुवनेश्वर कुमारने साहाला शून्यावरच  माघारी पाठवलं होतं. मात्र त्यानंतर साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोघांनंतर गुजरातचे इतर फलंदाज ढेपाळले. भुवीने पाच विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली. 20 ओ्व्हरमध्ये गुजरातने 188 धावा केल्या होत्या.

हैदराबाद संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर त्यांची सुरूवात एकदम खराब झाली होती.  अभिषेक शर्मा 4 धावा, राहुल त्रिपाठी 1 धाव, एडन मार्कराम 10 धावा, अब्दुल समद 4 धावा, सनवीर सिंग 7 धावा या सुरूवातीच्या खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. फक्त हेनरिक क्लासेन 64 धावा आणि भुवनेश्वर कुमार 27 धावा यांनी झुंज सुरू ठेवली होती. पण दोघे संघाला काही विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले नाहीत. आज झालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सनंतर स्पर्धेबाहेर होणार हैदराबाद दुसरा संघ ठरला आहे.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी आणि टी नटराजन.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, दासून शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी आणि नूर अहमद.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.