IPL 2024 Points Table: दिल्ली गुजरात सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ, टॉप 4 मध्ये कोणाला संधी? वाचा

आयपीएल 2024 स्पर्धेतील 40 सामने पार पडले आहेत. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. प्लेऑफसाठीची शर्यत आणखी चुरशीची झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सला 4 धावांनी मात देत दोन गुणांची कमाई केली आहे. चला जाणून घेऊयात कोण कुठे आहे ते

IPL 2024 Points Table: दिल्ली गुजरात सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ, टॉप 4 मध्ये कोणाला संधी? वाचा
Follow us
| Updated on: Apr 25, 2024 | 12:01 AM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 40 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. अतितटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या 4 धावांनी गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल गुजरात टायनटन्सच्या बाजूने लागला. दुसऱ्या डावात पडत असलेल्या दवबिंदूचं गणित डोक्यात ठेवून कर्णधार शुबमन गिल याने गोलंदाजी निवडली. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 4 गडी गमवून 224 धावा केल्या आणि विजयासाठी 225 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठण्याचा अगदी जवळ गुजरात टायटन्सचा संघ पोहोचला होता. दोलयामान स्थितीत हा सामना कधी इथे तर कधी तिथे झुकत होता. मात्र अखेर दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने थेट सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सला धोबीपछाड दिला आहे.

राजस्थान रॉयल्स प्लेऑफ शर्यतीत फक्त एक पाऊल दूर आहे. एका सामन्यात विजय मिळवताच राजस्थानचं प्लेऑफचं स्थान पक्कं होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स 10 गुण आणि 1.206 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद 10 गुण आणि 0.914 नेट रनरेटसह तिसऱ्या, लखनौ सुपर जायंट्स 10 गुण आणि 0.148 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्स 8 गुण आणि 0.415 नेट रनरेटसह पाचव्या स्थानी आहे.

दिल्ली कॅपिटल्सने आठव्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. 9 सामन्यात 4 सामने जिंकत 8 गुण आणि -0.386 नेट रनरेटसह सहाव्या स्थानी आहे. दिल्लीने मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सला धोबीपछाड दिला आहे. गुजरात टायटन्सचा संघ 8 गुण आणि -0.974 नेट रनरेटसह सातव्या स्थानी घसरण झाली आहे. मुंबई इंडियन्स 6 गुण आणि -0.227 नेट रनरेटसह आठव्या स्थानी आहे. पंजाब किंग्स 4 गुण आणि -0.292 नेट रनरेटसह नवव्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 2 गुण आणि -1.046 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.