IPL 2024 Purple Cap: पर्पल कॅपच्या शर्यतीत हर्षल पटेल, सॅम करनची एन्ट्री, कोण कुठे ते जाणून घ्या

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : आयपीएल स्पर्धेत पर्पल कॅपचा मान मिळवणं वाटतं तितकं सोप नाही. चार षटकं टाकताना गोलंदाजांचा चांगलाच घाम निघतो. त्यात पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांचा कस लागतो. फलंदाजांना संधी मिळाली की तोडफोड होते. अशा स्थितीत पर्पल कॅप मिळवणं मोठी गोष्ट आहे.

IPL 2024 Purple Cap: पर्पल कॅपच्या शर्यतीत हर्षल पटेल, सॅम करनची एन्ट्री, कोण कुठे ते जाणून घ्या
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 12:24 AM

आयपीएल 2024 स्पर्धेत पर्पल कॅपची शर्यत आणखी चुरशीची होणार यात शंका नाही. पंजाब किंग्स आणि गुजरात टाययन्स सामन्यानंतर यात रंगत वाढली आहे. कारण या शर्यतीत आता पंजाब किंग्सच्या हर्षल पटेल आणि सॅम करन यांनी एन्ट्री घेतली आहे. गुजारात टायटन्सने पंजाब किंग्स विरुद्धचा सामना 3 गडी राखून 19.1 षटकात पूर्ण केला. या सामन्यात पंजाब किंग्सने बऱ्यापैकी लढत दिली. तसेच हर्षल पटेलने 3 षटकात 15 धावा देत 3 गडी बाद केले. तर सॅम करनने 2 षटकात 18 धावा देत 1 गडी बाद केला. या कामगिरीनंतर या दोन्ही गोलंदाजांनी टॉप 5 मध्ये एन्ट्री मारली आहे. अव्वल स्थानी मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. त्याने 7 सामन्यात 13 गडी बाद केले आणि त्याचा इकोनॉमी रेट हा 5.96 इतका आहे. दुसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सच्या हर्षल पटेलने एन्ट्री मारली आहे. त्याने 8 सामन्यात 9.58 च्या इकोनॉमी रेटने 13 गडी बाद केले आहेत. दोघांचे सम विकेट असले तरी इकोनॉमी रेटमध्ये जसप्रीत बुमराह उजवा आहे.

तिसऱ्या स्थानावार राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आहे. त्याने 7 सामन्यात 8.34 च्या इकोनॉमी रेटने 12 गडी बाद केले. चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा गेराल्ड कोएत्झी आहे. त्याने 7 सामन्यात 9.92 च्या इकोनॉमी रेटने 12 गडी बाद केले आहेत. तर पाचव्या स्थानी पंजाब किंग्सच्या सॅम करनने एन्ट्री मारली आहे. त्याने 8 सामन्यात 8.79 च्या इकोनॉमी रेटने 11 गडी बाद केले आहेत. त्यामुळे आता ही लढत पुढे जाऊन आणखी रंगतदार होणार यात शंका नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): सॅम कुरन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा(विकेटकीपर), शुभमन गिल(कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, संदीप वॉरियर, मोहित शर्मा.

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.