AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2024 साठी आयर्लंड संघ जाहीर, कॅप्टन कोण?

Ireland squad for ICC T20i World Cup 2024 : आयर्लंडने टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला आहे. 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेणाऱ्या घातक गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे.

T20 World Cup 2024 साठी आयर्लंड संघ जाहीर, कॅप्टन कोण?
ireland cricket team,Image Credit source: Icc X account
| Updated on: May 08, 2024 | 7:59 PM
Share

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी आयर्लंडने संघ जाहीर केला आहे. आयर्लंड टीमने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. आयर्लंडच्या संघात आयपीएलमध्ये खेळणाऱ्या एका खेळाडूला संधी मिळाली आहे. जोशुआ लिटील याचा आयर्लंड टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. जोशुआ आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचं प्रतिनिधित्व करतोय. तसेच पॉल स्टर्लिंग याला अनुभवी खेळाडूला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. तसेच कर्टिस कॅम्फर याचाही समावेश करण्यात आला आहे. कर्टिस कॅम्फरने टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. कर्टिसने टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेत अबुधाबीमध्ये झालेल्या सामन्यात 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. कर्टिसने 10 व्या ओव्हरमध्ये कुलीन एकरमॅन, रियान टेन डोशेट, स्कॉट एडवर्ड्स आणि रुलोफ वन डेर मेरवे या चौघांना आऊट केलं होतं.

आयर्लंड ए ग्रुपमध्ये

टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार आयर्लंड टीम ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियाही ए ग्रुपमध्ये आहे. आयर्लंड साखळी फेरीत एकूण 4 सामने खेळणार आहे. आयर्लंड वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा टीम इंडिया विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर कॅनडा, यूएसए आणि पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड भिडणार आहे. आयर्लंड टीम उलटफेर करण्यात माहिर आहे. त्यामुळे आयर्लंड कुणाविरुद्ध उलटफेर करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी आयर्लंड संघ

आयर्लंडच्या सामन्याचं वेळापत्रक

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, न्यूयॉर्क, 5 जून आयर्लंड विरुद्ध कॅनडा, न्यूयॉर्क, 7 जून आयर्लंड विरुद्ध यूएसएए, फ्लोरिडा, 14 जून आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान, फ्लोरिडा, 16 जून.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी आयर्लंड टीम : पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्र्यू बालबिर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, जोशुआ लिटल, बॅरी मॅकार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.