Vaibhav Sooryavanshi : वैभवसमोर श्रीलंका दौऱ्यात आव्हान काय? इरफान पठाण स्पष्टच म्हणाला, पाहा व्हीडिओ
Irfan Pathan On Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी तिलक वर्मा याच्या नेतृत्वात श्रीलंका दौऱ्यात खेळणार आहे. इंडिया ए टीम श्रीलंका दौऱ्यात वनडे सीरिज खेळणार आहे. वैभवसाठी ही मालिका अतिशय महत्त्वाची असणार आहे.

वैभव सूर्यवंशी याने कमी वयात क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. या 15 वर्षांच्या फलंदाजाने विविध वयोगटातील स्पर्धेत खोऱ्याने धावा केल्या. वैभवने आयपीएल, देशांतर्गंत आणि अंडर 19 क्रिकेटमध्ये कमाल केली. त्यामुळे वैभव लवकरच सिनिअर टीम इंडियाकडून खेळताना दिसणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. टीम इंडिया आयपीएल 2026 नंतर आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. वैभवला या दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते. मात्र त्याआधी वैभवची इंडिया ए टीममध्ये निवड करण्यत आली आहे. वैभवची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे वैभव आतापर्यंत केलेली कामगिरी श्रीलंका दौऱ्यातही करुन दाखवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इंडिया ए टीमचा श्रीलंका दौरा
बीसीसीआयने गुरुवारी 14 मे रोजी श्रीलंका दौऱ्यासाठी इंडिया ए टीमची घोषणा केली. इंडिया ए टीम श्रीलंका दौऱ्यात ट्राय सीरिज खेळणार आहे. या वनडे ट्राय सीरिजमध्ये यजमान श्रीलंका, इंडिया ए आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. निवड समितीने या ट्राय सीरिजसाठी आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे.
तिलक वर्मा कॅप्टन
तिलक वर्मा श्रीलंका दौऱ्यात इंडिया ए टीमचं नेतृत्व करणार आहे. तर रियान पराग याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र वैभवच्या निवडीची चर्चा पाहायला मिळाली. वैभवने आतापर्यंत गोलंदाजांची धुलाई केलीय. मात्र वैभवचा या दौऱ्यात कस लागणार आहे. त्यामुळे वैभव संभाव्य आंतरराष्ट्रीय पदार्पणाआधी कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने वैभवसमोर या दौऱ्यात काय आव्हान असणार? याबाबत टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने भाष्य केलंय. त्याबाबत जाणून घेऊयात.
वैभवसमोर आव्हान काय? इरफान पठाण म्हणाला….
Boss Baby for India A! 🇮🇳🔥
Experts react to Vaibhav Sooryavanshi’s selection for the Indian national team’s A squad! 👏🏏#IndiaA #TilakVarma, #VaibhavSooryavanshi pic.twitter.com/k7epGeUKUg
— Star Sports (@StarSportsIndia) May 14, 2026
इरफान पठाण याने वैभवची इंडिया ए टीममध्ये निवड होताच प्रतिक्रिया दिली. तसेच वैभवसमोर काय आव्हान असणार? याबाबत आपलं मत मांडलं. वैभवला निवड समितीकडून देण्यात आलेल्या निर्णयाचं इरफानने समर्थन केलं.
“निवड समितीचा हा योग्य निर्णय आहे. दांबुलात वेगात वारे वाहतात, त्यामुळे गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे वैभव श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा कसा सामना करतो हे पाहावं लागेल. वैभव इतक्या कमी वयात जी कामगिरी करतोय ते पाहता तो हे आव्हान सहज पेलेल असं मला वाटतं”, असा विश्वास माजी गोलंदाजाने वैभवबाबत व्यक्त केला.