ENG vs SL : इंग्लंडच्या जेमी स्मिथचं ऐतिहासिक शतक, 94 वर्षांआधीचा महारेकॉर्ड ब्रेक
Jamie Smith Century Record: इंग्लंडचा युवा विकेटकीपर फलंदाज जेमी स्मिथ याने श्रीलंके विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकत इतिहास रचला आहे. जेमीने तब्बल 94 वर्षांआधीचा रेकॉर्ड उध्वस्त केला आहे.

श्रीलंका क्रिकेट टीम 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात या कसोटी मालिकेतील सलामीचा सामना हा मॅनचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम येथे खेळवण्यात येत आहे. इंग्लंडचा युवा विकेटकीपर बॅट्समन जेमी स्मिथ याने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील चौथ्या कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. जेमीन श्रीलंके विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी (23 ऑगस्ट) शतक ठोकत 94 वर्षांआधीचा महारेकॉर्ड केला आहे. श्रीलंकेने या सामन्यातील पहिल्या डावात 236 धावा केल्या. इंग्लंडने या प्रत्युत्तरात 358 धावांपर्यंत मजल मारत 122 धावांची आघाडी घेतली. जेमी स्मिथ याने इंग्लंडला 350 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. जेमीने श्रीलंके विरुद्ध कसोटी कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठोकलं. जेमीने 148 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 111 रन्स केल्या. जेमीने या दरम्यान महारेकॉर्ड केला आहे.
जेमी स्मिथचा धमाका
जेमी स्मिथ इंग्लंडसाठी शतक ठोकणारा सर्वात युवा विकेटकीपर फलंदाज ठरला. जेमीने यासह लेस एम्स याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. इंग्लंडच्या लेस एम्स याने 1930 साली पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिज विरुद्ध शतक ठोकलं होतं. एम्सने 24 वर्ष 60 दिवस इतकं वय असताना शतक ठोकलं होतं. आता हा विक्रम जेमी स्मिथ याने आपल्या नावे केला आहे. तर जेमीने 24 वर्ष 40 दिवस इतक वय असताना ही कामगिरी केली आहे.
इतकंच नाही तर जेमी स्मिथ डिसेंबर 2022 नंतर इंग्लंडकडून शतक करणारा पहिलाच विकेटकीपर बॅट्समन ठरला. इंग्लंडसाठी 2022 मध्ये ओली पोप याने पाकिस्तान विरुद्ध रावळपिंडी येथे विकेटकीपर बॅट्समन म्हणून शतकी खेळी केली होती. ओली पोप याचं तेव्हा 24 वर्ष 333 दिवस इतकं वय होतं.
जेमी स्मिथचं पहिलंच शतक ऐतिहासिक
Jamie Smith is the youngest wicketkeeper to score a Test hundred for England 🤩 #ENGvSL pic.twitter.com/YWudOTJYZK
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 23, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड आणि शोएब बशीर.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो आणि मिलन रथनायके.
