AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटमधून निवृत्ती कधी घेणार? जसप्रीत बुमराहने एका झटक्यात करिअरबाबत प्लान केला उघड

जसप्रीत बुमराह हा भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजीचा कणा आहे. त्यामुळे त्याचं संघात असणं भारतीय संघासाठी खूपच महत्त्वाचं आहे. पण दुखापतीमुळे गेल्या काही वर्षात त्याच्या करिअरमध्ये अडथळे आले आहे. असं असताना त्याने एका मुलाखतीत करिअर आणि कुटुंबाबाबत स्पष्ट काय ते सांगितलं.

क्रिकेटमधून निवृत्ती कधी घेणार? जसप्रीत बुमराहने एका झटक्यात करिअरबाबत प्लान केला उघड
जसप्रीत बुमराहImage Credit source: Getty Images
| Updated on: May 30, 2025 | 8:06 PM
Share

भारतीय क्रिकेट संघ सध्या संक्रमण अवस्थेत आहे. दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीमुळे संघ कात टाकत असल्याचं दिसत आहे. आर अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या दिग्गज खेळाडूंची जागा भरून काढणं वाटतं तितकं सोपं नाही. असं असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जसप्रीत बुमराहने मोठं वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यातून निवृत्तीचे संकेत मिळू लागले आहेत. जसप्रीत बुमराहने एका मुलाखतीत करिअरपेक्षा कुटुंब महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. 20 जूनपासून भारत इंग्लंड कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत बुमराह भारतीय संघाची ताकद असणार आहे. पण सर्व कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत शंका आहे. कारण दुखापतीमुळे तसं होणं शक्य नाही. असं असताना बुमराहच्या वक्तव्याने टेन्शन वाढलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने जसप्रीत बुमराहची मुलाखत घेतली. यावेळी त्याने बुमराहने वर्कलोड, कुटुंब यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्याने स्पष्ट केलं की करिअरपेक्षा कुटुंब महत्त्वाचं आहे. बियॉन्ड 23 पॉडकास्टवर जसप्रीत बुमराहने सांगितलं की, ‘माझ्यासाठी करिअर पेक्षा माझं कुटुंब महत्त्वाचं आहे. कारण ते कायमस्वरूपी आहे. मी दोन गोष्टी खूपच गंभीरतेने घेतो. एक कुटुंब आणि दुसरा माझा खेळ. पण कुटुंब पहिलं येतं.’

जसप्रीत बुमराहने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कला सांगितलं की, ‘इंग्लंडमध्ये खेळणं हे वेगळं आव्हान आहे. मला ड्यूक्स चेंडूने गोलंदाजी करायला आवडतं. तिकडचं वातावरण, स्विंगिंग कंडीशन्स आणि जेव्हा चेंडू सॉफ्ट होतो तेव्हा गोलंदाजी करणं सोपं नसतं. यासाठी मी इंग्लंडमध्ये खेळण्यास उत्सुक असतो. इंग्लंड वेगळ्या शैलीत खेळतात. ते मला पूर्णपणे कळत नाही. गोलंदाजी युनिट म्हणून आमच्यात आत्मविश्वास आहे. फलंदाज जेव्हा आक्रमक खेळतात तेव्हा लवकर विकेट घेण्याची शक्यता असते.’

बुमराहने पुढे सांगितलं की, ‘कोणत्याही खेळाडूसाठी प्रत्येक फॉरमेट सतत खेळणं सोप नसते. मी हे खूप दिवसांपासून करत आहे. पण एका विशिष्ट वेळेनंतर तुम्हाला समजून घ्यावे लागेल की शरीर कोणत्या दिशेने जात आहे. कोणती स्पर्धा सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून एखाद्याला आपल्या शरीराचा वापर कसा करायचा याबद्दल थोडे शहाणपण असायला हवे.’

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.