AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“नक्कीच काहीतरी घडलं आहे”, जसप्रीत बुमराहच्या ‘त्या’ पोस्टनंतर माजी निवड समिती अध्यक्षांनी मांडलं मत

आयपीएल 2024 स्पर्धेसाठी आतापासून तयारी सुरु झाली आहे. पण मुंबई इंडियन्स संघात सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. हार्दिक पांड्याला मुंबईने संघात घेतल्यानंतर कुजबूज सुरु झाली आहे. अधिकृतरित्या कोणीही बोलत नसलं तरी काही ना काही हिंट दिली जात आहे. माजी निवड समिती अध्यक्ष क्रिस श्रीकांत यांनीही याबाबत आपलं मत मांडलं आहे.

नक्कीच काहीतरी घडलं आहे, जसप्रीत बुमराहच्या 'त्या' पोस्टनंतर माजी निवड समिती अध्यक्षांनी मांडलं मत
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हार्दिक पांड्याच्या एन्ट्रीने कुजबूज! माजी निवड समिती अध्यक्षांनीही व्यक्त केला संशय
| Updated on: Nov 29, 2023 | 8:46 PM
Share

मुंबई : आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्सची सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली आहे. मुंबईने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे या संघात खेळण्याची बहुतांश खेळाडूंची इच्छा असते. दोन वर्षापूर्वी हार्दिक पांड्या देखील याच संघात खेळत होता. पण गुजरात टायटन्सची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आणि तो त्या संघासोबत जोडला गेला. गुजरात टायटन्स जेतेपदही मिळवून दिलं. पण आता दोन वर्षानंतर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. त्यामुळे या संघात कुजबूज सुरू झाली आहे. उघडपणे कोणीही याबाबत वाच्यता केलेली नाही. मात्र समाजमाध्यमांवर क्रिप्टिक मेसेजद्वारे बरंच काही सांगून टाकलं आहे. जसप्रीत बुमराह याने कधी कधी गप्प राहणं चांगलं असतं अशी इन्स्टास्टोरी टाकली होती. त्यावरून बरीच चर्चा रंगली होती. आता माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती अध्यक्ष क्रिस श्रीकांत यांनी आपलं मत मांडलं आहे.

“जसप्रीत बुमराहसारखा दुसरा क्रिकेटपटू मिळू शकत नाही. मग ती कसोटी असो की व्हॉईट बॉल क्रिकेट. तो सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याला वाटतं की त्याने मुंबई इंडियन्ससोबत राहावं. पण फ्रेंचाइसी आता अशा व्यक्तीचा आनंद साजरा करतो जी व्यक्ती गेली आणि परत आली.” असं क्रिस श्रीकांत यांनी यूट्यूब चॅनेलवर सांगितलं.

“चेन्नई सुपर किंग्सच्या रवींद्र जडेजासोबतही असंच काही झालं होतं. पण टीम व्यवस्थापक आणि कर्णधाराने हे प्रकरण व्यवस्थितरित्या हाताळलं. मला नक्कीच असं वाटतं की, टीम व्यवस्थापक पांड्या आणि बुमराह यांच्यासोबत बसतील. रोहित हे प्रकरण व्यवस्थित हाताळेल. पांड्या आल्याने बुमराहला असं वाटू शकतं की तो या संघाचं नेतृत्व करू शकतो. जर तो नाराज आहे. तर नक्कीच काहीतरी घडलं आहे.”, असं क्रिस श्रीकांत याने सांगितलं.

मुंबई इंडियन्समध्ये 2015 साली डेब्यू केल्यानंतर मुंबई इंडियन्सचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. चार जेतेपद जिंकून देण्यात त्याचा मोलाचा हाता आहे. जसप्रीत बुमराह याने इंस्टाग्रामवर एमआयचं पेज अनफॉलो केल्याचे स्क्रिनशॉट काही फॅन्सनी टाकले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.