Jemimah Rodrigues: चुलत भावांना वाटले की मेली..! जेमिमा रॉड्रिग्सने केला मोठा खुलासा
भारतीय महिला क्रिकेट संघाचा कणा म्हणून जेमिमा रॉड्रिग्सकडे पाहिलं जातं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीतील तिची कोणीच विसरू शकणार नाही. जेमिमा रॉड्रिग्सचा मोठा चाहता वर्ग आहे. जेमिमाने 8 वर्षांची असताना घडलेल्या प्रसंगाची आठवण सांगितली.

भारतीय वुमन्स क्रिकेट संघाची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. लहानपणी तिने सांगितलेला किस्सा ऐकून अनेकांना धक्का बसला. कारण जेमिमा मरता मरता वाचली होती. पण हा किस्सा आता ऐकताना अनेकांना हसू आवरत नाही. जेमिमा रॉड्रिग्स 8 वर्षांची असताना हा प्रसंग घडला होता. तेव्हा जर विचित्र घडलं असतं तर जेमिमाला गंभीर दुखापत झाली असती. पण सुदैवाने तसं काही झालं नाही. जेमिमा 8 वर्षांची असताना चुलत भावंडांसोबत चर्चेमध्ये एका कार्यक्रमासाठी गेली होती. तेव्हा कार्यक्रम ऑडिटोरियमच्या आत सुरू होता. तर आम्ही भावंड बाहेर खेळत होतो. तेव्हा आम्ही चप्पल फाइट करत होतो. यात एकमेकांवर चप्पल फेकायच्या. नियम असा होता की फेकलेली वस्तू दुसऱ्या टीमने उचलावी. या खेळादरम्यान, जेमिमा पहिल्या मजल्यावरून पडली होती आणि थोडक्यात वाचली होती.
जेमिमा रॉड्रिग्स म्हणाली की, ‘आम्ही एका ऑडिटोरियमच्या होतो जिथे चर्चचा कार्यक्रम चालू होता. सर्व मुले बाहेर होती. आम्ही चप्पलांनी खेळत होतो. मी तेव्हा आठ वर्षांची होते आणि माझ्या चुलत भावाने चप्पल फेकल्या आणि मला त्या घेण्यासाठी दुसऱ्या बाजूला उडी मारावी लागली होती. मी एका खऱ्या हिरोप्रमाणे जोशात म्हणाली की मी त्या घेईन. मग मी पहिल्या मजल्यावरून पडले. सुदैवाने कोणीतरी खाली बसले होते आणि मी त्यांच्या डोक्यावर पडलो. माझ्या चुलत भावांना वाटले की मी मेली आहे .’
जेमिमा रॉड्रिग्स ही दिल्ली कॅपिटल्स संघाकडून मैदानात उतरणार आहे. तिच्याकडे यंदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तिन्ही पर्वात दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरी गाठली होती. पण तिन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं. जेमिमा रॉड्रिग्सच्या नेतृत्वात जेतेपद मिळवणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जेमिमा रॉड्रिग्जने आतापर्यंत 27 डब्ल्यूपीएल सामने खेळले आहेत. यात 139.67 च्या स्ट्राइक रेटने 507 धावा केल्या आहेत. जेमिमा रॉड्रिग्स सध्या फॉर्मात आहे आणि तिच्याकडून या पर्वातही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
