Mumbai Indians च टेन्शन वाढलं, जसप्रीत बुमराह पाठोपाठ आणखी एक बॉलर बाहेर होणार?
आधीच जसप्रीत बुमराह नसल्यामुळे मुंबई इंडियन्सची गोलंदाजीची बाजू कमकुवत झालीय. मुंबई इंडियन्ससाठी एका चिंता वाढवणारी बातमी आहे. बऱ्याच महिन्यांपासून पाठदुखीने त्रस्त असलेल्या जसप्रीत बुमराहच ऑपरेशन यशस्वी झालं आहे.

Jofra Archer Fitness : मुंबई इंडियन्ससाठी एका चिंता वाढवणारी बातमी आहे. इंग्लंडच्या मर्यादीत ओव्हर्सच्या टीमचे मुख्य कोच मॅथ्यू मॉट यांनी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या फिटनेसबद्दल महत्त्वाची अपडेट दिलीय. जोफ्रा आर्चर पाठीच्या दुखापतीमधून सावरतोय. पण अजूनही तो पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करु शकत नाहीय. आधीच जसप्रीत बुमराह नसल्यामुळे मुंबई इंडियन्सची गोलंदाजीची बाजू कमकुवत झालीय. त्यात आता जोफ्रा आर्चर खेळणार नसेल, तर मुंबई इंडियन्सची चिंता आणखी वाढू शकते. मागच्यावर्षी ऑक्शनमध्ये जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं होतं. पण पाठीच्या दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सला जोफ्रा आर्चरकडून भरपूर अपेक्षा आहेत.
त्याला मागच्यावर्षी पुनरागमन करायच होतं
जोफ्रा आर्चर आता 27 वर्षांचा आहे. मार्च 2021 पासून तो इंग्लंडकडून एकही सामना खेळलेला नाही. कोपरा आणि पाठीच्या दुखापतीमुळे तो जुलै 2021 पासून एकही मॅच खेळलेला नाही. 2021 मध्ये हाताच्या कोपराच ऑपरेशन झालं. त्याला मागच्यावर्षी पुनरागमन करायच होतं. पण पुन्हा त्याला पाठदुखीचा त्रास सुरु झाला. रिपोर्ट्नुसार जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्ससाठी 2023 च्या पूर्ण सीजनमध्ये खेळायच आहे. त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहोत असं मॉट यांनी सांगितलं. आर्चरला मुंबई इंडियन्सने आठ कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं आहे.
मुंबई इंडियन्सच टेन्शन वाढणार
आर्चरला सलग दोन मॅचमध्ये खेळवायच नाही, या डॉक्टरांच्या सल्ल्यावर अमल करतोय, असं मॉट यांनी सांगितलं. ‘सलग दोन मॅचमध्ये त्याला उतरवू नये, असा डॉक्टरांचा सल्ला होता’ असं स्काय स्पोर्ट्सवर म्हणाले. पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करत नसल्याच त्याने मान्य केलय असं मॉट म्हणाले. सर्वश्रेष्ठ गोलंदाजी करण्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करतोय असं मॉट यांनी सांगितलं. ऑपरेशन यशस्वी
बऱ्याच महिन्यांपासून पाठदुखीने त्रस्त असलेल्या जसप्रीत बुमराहच ऑपरेशन यशस्वी झालं आहे. न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च शहरातील हॉस्पिटलमध्ये जसप्रीत बुमराहवर शस्त्रक्रिया झाली. फॉर्टे ऑर्थोपेडिक्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रोवॅन शूटन यांनी हे ऑपरेशन केलं. ही सर्जरी यशस्वी ठरलीय. जसप्रीत बुमराह स्ट्रेस बॅक फ्रॅक्चरने हैराण होता. जसप्रीत बुमराह या सीजनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळणार नाही.
