AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC 15 : सचिन तेंडुलकरला धरून विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर इशान आणि स्मृती मंधाना ‘क्लिन बोल्ड’, शेवटी झालं असं की…

भारतीय क्रिकेटमध्ये मैदान गाजवणारे स्मृती मंधाना आणि इशान किशन यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी या जोडीने किचकट प्रश्नांचा सामना केला. सचिन तेंडुलकरला अनुसरून एक प्रश्न विचारताच दोघांची भंबेरी उडाली. खूप सारी चर्चा करूनही उत्तर येत नव्हतं अखेर...

KBC 15 : सचिन तेंडुलकरला धरून विचारलेल्या 'त्या' प्रश्नावर इशान आणि स्मृती मंधाना 'क्लिन बोल्ड', शेवटी झालं असं की...
KBC 15: क्रिकेटच्या देवाला साक्षी ठेवून इशान स्मृतीला विचारल असा प्रश्न, उत्तर देता देता दोघांची उडाली भंबेरी
| Updated on: Dec 26, 2023 | 4:44 PM
Share

मुंबई : इशान किशनने मानसिक थकव्यामुळे दक्षिण अफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आहे. गेल्या वर्षभरापासून इशान किशन टीम इंडियासोबत आहे. कधी प्लेइंग इलेव्हनमध्ये, तर कधी डग आऊटमध्ये अशी इशानची स्थिती होती. आता मायदेशी परतलेल्या इशानने क्रिकेटपटू स्मृती मंधानासोबत कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात हजेरी लावली. केबीसीच्या 15 व्या पर्वात स्पेशल गेस्ट म्हणून कार्यक्रमात भाग घेतला. हॉट सीटवर बसलेल्या इशान आणि स्मृतीने 12 प्रश्नांचा सामना केला आणि 12.5 लाख रुपये जिंकले.  12 वा प्रश्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला अनुसरून होता. त्यानंतर 13 व्य प्रश्नाला दोघांवर गेम सोडण्याची वेळ आली. 12 वा प्रश्न इतका किचकट होता की, भल्याभल्यांची भंबेरी उडाली असती. पण वय वर्ष 40 च्या आसपास असलेल्या क्रीडाप्रेमींनी कॅलक्यूलेशन लावून या प्रश्नाचं सहज उत्तर देता आलं असतं. पण नव्या पिढीच्या क्रीडाप्रेमींना आणि क्रिकेटर्सनं हे गणित सोडवणं तसं कठीण आहे. त्याचा अंदाज स्मृती मंधाना आणि इशान किशनला विचारलेल्या त्या प्रश्नावरून आला.

इशान किशन आणि स्मृती मंधाना यांनी 12 प्रश्नांची अचूक उत्तरं देत 12.5 लाखांची रक्कम जमा केली होती. यानंतर 13 व्या प्रश्न विचारताच त्याना गेम सोडावा लागला. कारण 12 व्या प्रश्नाला सर्व लाईफ लाईन खर्च करण्याची वेळ आली होती. प्रश्न असा होता की, सचिन तेंडुलकरने आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक केलं तेव्हा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने त्या सामन्यात पदार्पण केलं होतं? त्या प्रश्नासाठी चार पर्याय होते. राहुल द्रविड, अनिल कुंबले, सौरव गांगुली आणि जवागल श्रीनाथ असे चार पर्याय होते.

प्रश्न विचारल्यानंतर इशान आणि स्मृती मंधाना यांनी एकमेकांची मतं जाणून घेतली. पण दोघंही आपल्या उत्तरावर ठाम नव्हते. त्यामुळे त्यांनी फोन ऑफ फ्रेंड ही लाईफ लाईन वापरण्याचा निर्णय घेतला. पण ज्या मित्राला फोन लावला त्या मित्राला सुद्धा त्या प्रश्नाचं नीट उत्तर देता आलं नाही. त्यानंतर दोघांनी डबल डिप लाईफ लाईन वापरली. त्यामुळे इशानला उत्तर देण्यासाठी दोन पर्याय मिळाले. पहिल्यांदा इशानने चुकीचं उत्तर दिलं. त्यानंतर दुसरं उत्तर अनिल कुंबले दिलं आणि ते बरोबर ठरलं. तेरावा प्रश्न विचारल्यानंतर दोघांकडे एकही लाईफ लाईन नव्हती त्यामुळे गेम सोडण्याचा निर्णय घेतला.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.