केविन पीटरसनने पंतप्रधान मोदींच्या इंग्रजी पत्राला हिंदीतून दिलं उत्तर, जाणून घ्या कारण…

केविन पीटरसनने पंतप्रधान मोदींच्या इंग्रजी पत्राला हिंदीतून दिलं उत्तर, जाणून घ्या कारण...
kevin-peterson icc cricket

आता इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन (Kevin Piertersen) यानेही मोदी यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे त्याने मोदी यांच्या इंग्रजीतील पत्राला हिंदीतून उत्तर दिले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 29, 2022 | 10:23 AM

यंदा भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताला यंदाच्या वर्षी स्वातंत्र्य मिळून 75 वर्षही पूर्ण झाले आहे. यानिमित्त केंद्र शासनाकडून ‘आजादी का अमृतमहोत्सव’ या हॅशटॅगखाली विविध उपक्रमदेखील राबविण्यात येत आहेत. दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारताशी चांगले संबंधित व भारतीयांशी आपुलकी असलेल्या जगभरातील अनेक खेळाडू तसेच इतर मान्यवरांना पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी पाठविलेल्या पत्राला दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी रोड्‌सनेही उत्तर देत भारतीयांची मने जिंकली होती. आता इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन (Kevin Piertersen) यानेही मोदी यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे त्याने मोदी यांच्या इंग्रजीतील पत्राला हिंदीतून उत्तर दिले आहे. यासह वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) यानेदेखील आपल्याला मिळालेल्या पत्राबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सर्व भारतीय जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

वन्यजिवांबाबत विशेष काम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केविन पीटरसनला पत्र दिल्यानंतर केविननेही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पंतप्रधान मोदी यांचे पत्र व त्याला हिंदीतून दिलेले उत्तर हे पोस्ट केले आहे. तसेच त्याने सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान वन्यजिवांसाठी करीत असलेल्या विशेष कामाबाबत त्याने आपल्या पत्रात कौतुकदेखील केल आहे. शिवाय आपण पंतप्रधान मोदी यांना भेटण्यास इच्छुक असल्याचेही लिहिले आहे.

इंग्रजी पत्राला हिंदीतून उत्तर
पीटरसनने हिंदीत लिहिलेल्या पत्रात म्हटलेय की, ‘नरेंद्र मोदीजी आपल्या पत्रासाठी धन्यवाद. 2003 मध्ये मी भारतात पाऊल ठेवल्यापासून प्रत्येक भेटीत भारताबद्दलचे माझे प्रेम वाढले आहे. ‘तुम्हाला भारताबद्दल सर्वात जास्त काय आवडते, असा प्रश्न मला नुकताच विचारण्यात आला होता. त्यावेळी माझे उत्तर होते, लोक. एक अभिमानी देश आणि जागतिक दर्जाचे ‘पॉवरहाऊस’ असलेला भारत आपल्या वन्यजिवांचे संरक्षण करण्यात जगाचे नेतृत्व करत आहे. याबद्दल धन्यवाद देण्यासाठी मी तुम्हाला लवकरच प्रत्यक्ष भेटण्यास उत्सुक आहे!’

रोड्‌स अन्‌ गेलनेही केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉन्टी रोड्‌स व ख्रिस गेल यांनाही पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याला उत्तर देताना हे दोन्ही खेळाडू भारावले. त्यांनी आपआपल्या सोशल मीडिया अकाउंटमधून मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जॉन्टी रोड्सने ट्विटरवर लिहिले की, ‘भारताच्या प्रत्येक दौऱ्यावर एक व्यक्ती म्हणून मी खरोखरच स्वत:ला अधिक समृद्ध करीत असतो. माझे संपूर्ण कुटुंब प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व जाणते व भारतासह ते साजरे करते. भारतीय लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या संविधानाचा आम्हांला मनापासून आदर आहे.

Kevin Pietersen Thanks PM Narendra Modi For His Greetings On Republic Day

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें