IPL 2022, LSG : लखनौ संघाला मोठा धक्का, मॅचच्या तासभरआधी CEOच्या गाडीला भीषण अपघात

रघू अय्यर हे हॉटेलमधून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमकडे टीम बससह प्रवास करताना हा अपघात झालाय.

IPL 2022, LSG : लखनौ संघाला मोठा धक्का, मॅचच्या तासभरआधी CEOच्या गाडीला भीषण अपघात
LSG
Image Credit source: social
| Updated on: Apr 29, 2022 | 9:09 PM

मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघामध्ये सामना सुरू आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन येथे आयपीएलच्या 42 व्या सामन्यात पंजाबने टॉस जिंकलाय. तर लखनौचा संघ फलंदाजी करत आहे. दरम्यान, सामना सुरू होण्याच्या तासाभरापूर्वी लखनौ सुपर जायंट्सचे सीईओ रघू अय्यर, त्यांची सहाय्यक रचिता बेरी आणि गौतम गंभीरचा व्यवस्थापक गौरव अरोरा यांचा कार अपघात झाला. लखनौचा संघ सामन्यासाठी स्टेडियमकडे जात असताना हे वृत्त आलं. रघू अय्यर हे हॉटेलमधून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमकडे टीम बससह प्रवास करताना हा अपघात झालाय. यामुळे संघाला मोठा धक्का बसला आहे. अपघात झाला तेव्हा रघू अय्यर हे टीम बसच्या मागे जात असलेल्या कारमधून इतर दोन लोकांसह प्रवास करत होते. यात सहभागी लोक देखील जखमी असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.

लखनौ सुपर जायंट्सचं ट्विट

लखनौला पहिला झटका

लखनौला पहिला झटका बसला असून संघाचा कर्णधार केएल राहुल आऊट झालाय. त्याने 11 चेंडूत फक्त सहा धावा काढल्या आहेत. त्यात त्याने एक चौकार लगावलाय. लखनौचा संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. संघाने पाच सामने जिंकले आहेत, तर तीन पराभवाचा सामना केलाय. पंजाब संघाने आठ सामन्यांत चार विजय आणि तितक्यात सामन्यात पराभवाचा सामना केलाय. सुपर जायंट्सने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभूत केलं होतं. तर पंजाब किंग्ज संघ चेन्नई सुपर किंग्जचा 11 धावांनी पराभव केला होता. पंजाबसमोर विजयाची घोडदौड कायम राखण्याचं लखनौचं मोठं आव्हान असणार आहे. मात्र, कर्णधार आऊट झाल्याने डॉ कॉकचं टेन्शन वाढल्याचं दिसतंय.